For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुमचा भाऊ शासन दरबारी आलेली अडचण सोडवेल

06:00 PM May 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
तुमचा भाऊ शासन दरबारी आलेली अडचण सोडवेल
Advertisement

कुडाळातील महिला मेळाव्यात आमदार निलेश राणेंचा शब्द

Advertisement

वार्ताहर/ कुडाळ
कुठलीही व्यवस्था ही महिलांसाठी असुदे किंवा पुरुषासाठी असुदे. जेव्हा एक आर्थिक व्यवस्था म्हणून आपण उभी करीत असतो. त्यावेळी त्या आर्थिक व्यवस्थेमध्ये सगळे काही नीट आहे ना. कुठे गळती नाही ना. सगळीकडे तो निधी पोहोचतो की नाही. यावर लक्ष ठेवणे हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे व तुम्हा अधिकारी वर्गाचे काम आहे. काही प्रभाग असे आहेत की आजही त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. अनेक महिला आजही या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया. तुमचा एक भाऊ म्हणून तुम्हाला शासन दरबारी काय अडचण येत असेल तर आपल्याला सांगा. तुमची सगळी व्यवस्था आमदार निधीतून नाही तर नीलेश राणे यांच्या निधीतून केली जाईल, असा शब्द आमदार नीलेश राणे यांनी बुधवारी येथे दिला.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत महिलांच्यावतीने उमेद महिला मेळावा येथील वासुदेवानंद सभागृहात आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार,कुडाळ तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, कुडाळ पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जि. प. माजी अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, अरविंद करलकर, उमेद कर्मचारी संघटना अध्यक्षा उषा नेरूरकर, उपाध्यक्षा सोनाली सावंत, सचिव रंजना मेस्त्री, साधना माडये, निलेश तेंडुलकर,राकेश कांदे आदी महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.