हिंदुत्व, विकास ,जनसेवा तत्त्वांवर ठाम राहून जनतेचा विश्वास जिंकणार
आ . निलेश राणेंचा निर्धार ;मालवणात शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
मालवण | प्रतिनिधी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहर येथील दैवज्ञ भवन सभागृह येथे पार पडली.पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनाची बळकटी आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली. शिवसेना नेहमीप्रमाणे हिंदुत्व, विकास आणि जनसेवा या तत्त्वांवर ठाम राहून जनतेचा विश्वास जिंकत मोठ्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.या बैठकीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, शहरप्रमुख दीपक पाटकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळस्कर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.