इन्सुलीत आ. निलेश राणेंनी केले राजन तेलींचे स्वागत
प्रतिनिधी
बांदा
नुकताच शिवसेना शिंदेगटात प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांचे इन्सुली खामदेव नाका येथे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन तेली प्रथमच जिल्ह्यात आले आहेत. त्यानिमित्त दौऱ्यावर असलेल्या आमदार निलेश राणे यांच्या कडुन त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले . यावेळी आमदार निलेश राणे यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, मडूरा सरपंच उदय चिंदरकर, उपजिल्हाप्रमुख अर्चना पांगम, उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी, रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर, कास माजी सरपंच भाई भाईप, ज्ञानेश्वर सावंत,
माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश वीरनोडकर, केतन वेंगुर्लेकर,पांडुरंग नाटेकर, साईप्रसाद राणे, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, सोमनाथ परब, बाबली परब, रामदास गवंडी, शंकर परब, नारायण परब, काका चराटकर, गुंडू झांट्ये, लाडू परब, बाळा कासकर, वसंत जाधव, आपा परब, निखिल कुडव, जयराम गवंडे, दिनेश राणे,आशिष झाटये, अक्षय वेंगुर्लेकर आदिसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.