For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक

12:07 PM Oct 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक
Advertisement

आमदार निलेश राणेंनी वेधले लक्ष

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली.या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी वर्ग अशा प्रकारचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होते याकरिता आमदार निलेश राणे यांनी पूर्णवेळ विभाग नियंत्रक नेमावा अशी आग्रहाची भूमिका मांडल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ नियुक्ती करावी असे माननीय परिवहन मंत्री यांनी निर्देश दिले त्याचबरोबर सिंधुदुर्गनगरी बसस्थानकासाठी सुमारे 50 गुंठे क्षेत्रावर सुसज्ज व आधुनिक सुविधा असलेले बसस्थानक उभारण्याचे निर्देश देखील मंत्री महोदयांनी यावेळी दिले.त्याचबरोबर कुडाळ बसस्थानकातील आसन व्यवस्था वाढविणे,प्रवाशांसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देणे ,नव्याने दिलेल्या सीएनजी गाड्यांसाठी लागणाऱ्या सीएनजी पंपाची जागा कुडाळ डेपोमध्ये निश्चित करण्यात यावी असेही मंत्री महोदयांनी सांगितले याशिवाय आमदार श्री राणे त्यांनी कुडाळ आणि मालवण डेपोंना प्रत्येकी पाच नव्या गाड्या तातडीने देण्याचे आदेश देण्यात यावेत,कसाल बसस्थानकाची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने ती नव्याने उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावे अशी ही मागणी त्यांनी केली यानंतर मंत्री महोदयांनी स्पष्ट शब्दात सदरहू प्रलंबित कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील मंत्री महोदयांनी दिले.या बैठकीस परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांच्यासमवेत विभाग नियंत्रक प्रकाश बोरसे, विभागीय अधीक्षक अभियंता अक्षय केकरे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख तसेच विभागीय कर्मचारी अमित कलकुटकी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.