For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार निलेश राणेंच्या हस्ते रुग्णावाहिकांचे लोकार्पण

11:50 AM Aug 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आमदार निलेश राणेंच्या हस्ते रुग्णावाहिकांचे लोकार्पण
Advertisement

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मालवण ,कुडाळसाठी दोन रुग्णवाहिका

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातील दोन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मामा वरेकर नाट्यगृह मालवण येथे संपन्न झाले.आमदार निलेश राणे यांनी जिजाऊ संस्था संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या सेवाभावी सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. जिजाऊ संस्था संपूर्ण महाराष्ट्रात काम करतं आहे. रत्नागिरी येथील त्यांच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. उपचार, औषध मोफत असणारे हे बहुदा देशातील अग्रक्रमातील आदर्शवत कार्य आहे. आज मालवण कुडाळ मतदारसंघांसाठी त्यांनी दोन रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिल्यात. त्यांचे सामाजिक कार्य असेच अखंडित सुरु राहो. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी जिजाऊ संस्थेस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था रत्नागिरी विभाग जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, शिवसेना कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, शेखर गाड, बाळू तारी, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, शिवसेना शहर पदाधिकारी राजू बिडये, राजन परुळेकर, अभय कदम, महेश सारंग, विलास मुणगेकर, मंदार लुडबे, शिवसेना महिला जिल्हा संघटक अंजना सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, गीता नाटेकर यांसह जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था सचिव केदार चव्हाण, मंदार नैकर तालुकाध्यक्ष रत्नागिरी, योगेश पांचाळ तालुकाध्यक्ष लांजा, दीपक सांबरे कोतवडे वाटद खंडाळा विभाग प्रमुख, ओमकार तिवरेकर गुहागर, सचिन गोताड, परशुराम शिंदे, मुकेश होरंबे, सिद्देश सावंत, साहिल गोरे, साहिराज कोलते, विजय सुवरे, रोहन धनावडे, अनिकेत जाधव, प्रसन्न जाधव, विशाल मयेकर व सहकारी उपस्थित होते. जनतेला अधिकधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सातत्याने प्रयत्नशील आहेत. गतिमान विकासकामे, सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मालवण कुडाळ साठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.