शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी दीपा सावंत यांची निवड
आमदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे सुपुत्र दिलीप उर्फ दीपा सावंत यांच्याकडे शिंदे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दीपा सावंत यांना दिले. यावेळी आ. डॉ. निलेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पक्षवाढीसाठी काम करण्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, दादा साईल, दीपक पाटकर, संतोष साठविलकर, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर सरपंच नेहा परब, राजन माणगावकर, आतिक शेख, शेखर फोंडेकर, विनीत भोजने, शाम आवळेगावकर, अमित सावंत, सागर माळवदे, नंदकुमार परब, अण्णा कुबल, अनिल ढोलम , दयानंद चव्हाण, बिपीन परब, अशोक परब, भाई परब, विलास बांदेकर, मंथन कुबल व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेची यशस्वी घोडदौड सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच प्रकारे सुरू राहील आम्ही सर्वजण आ. निलेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वात पक्षवाढीसाठी जोमाने काम करू असा विश्वास दीपा सावंतयांनी व्यक्त केला.