आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराचा केला स्पॉट पंचनामा
नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून
मालवण | प्रतिनिधी
कुडाळ - मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराचा बुधवारी रात्री स्पॉट पंचनामा केला. मालवण शहराची रात्री पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मालवण बंदर जेटी येथील बंद लाईट, मालवण मच्छी मार्केट परिसरातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, सेल्फी पॉईंटची दूरवस्था , कचरा व्यवस्थापन मशीन व पर्यटकांसाठी बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाची पहाणी केली.दूरवस्थेत असलेल्या मालवण बंदर जेटी परिसरात चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी ही पहाणी करण्यात आली. बंदर जेटी स्वच्छ सुरक्षित आणि आकर्षक बनविण्यासाठी काय करता येईल याची माहिती घेतली.तसेच मालवण नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथे नवी इमारत उभारणी सुरु असून ही इमारत उभारणी रखडली आहे. याबाबत पाहणी केली व माहिती जाणून घेतली. या बाबत प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या सूचना देणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे,उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवामोर्चा शहरप्रमुख ललित चव्हाण, निषय पालेकर, अमोल केळुसकर यांसह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
नागरिकांमधून समाधान व्यक्त
मालवण शहरातील कचरा समस्या, बंद स्ट्रीट लाईट, मोकाट जनावरे आदी समस्या बाबत आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहाणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत नागरिक व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले. आमदार निलेश राणे यांनी लक्ष टाकले म्हणजे निश्चितच योग्य ती कार्यवाही होणार. अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.