For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवर ‘आमदार’ उल्लेख, गळ्यात नोटांचा हार

05:06 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
कारवर ‘आमदार’ उल्लेख  गळ्यात नोटांचा हार
Advertisement

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन

Advertisement

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील बयाना मतदारसंघातील भाजप उमेवदार बच्चू बन्सीलाल हे गळ्यात नोटांचा हार घालून प्रचार आहेत. याचबरोबर बन्सीलाल हे अत्यंत थाटात विधायक (आमदार) असे लिहिण्यात आलेल्या कारमधून फिरत आहेत. हा प्रकार उघडकीस येताच निवडणूक अधिकाऱ्याने याला आचार संहितेचे उल्लंघन मानत उमेदवाराला नोटीस जारी केली आहे.

भाजपने बयाना मतदारसंघात बच्चू बन्सीलाल यांना तिकीट दिले आहे. भाजप उमेदवार बन्सीलाल हे सध्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. याचदरम्यान नोटांनी गुंफण्यात आलेला हार घालून प्रचार करताना ते दिसून आले आहेत. गळ्यात नोटांचा हार घालून प्रचार करण्याचे कृत्य आचारसंहिता उल्लंघनाच्या श्रेणीत मोडते.

Advertisement

याचबरोबर बन्सीलाल हे हरियाणात नोंदणीकृत असलेली कार प्रचारासाठी वापरत आहेत. या कारवर विधायक असे लिहिले गेले आहे. बन्सीलाल हे 2013 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते निवडून आले नसले तरीही त्यांना या पदाचा मोह सुटलेला नाही. बन्सीलाल हे अद्याप स्वत:ला आमदारच मानतात. बन्सीलाल हे विधायक असे लिहिण्यात आलेली कार प्रचारासाठी वापरत असल्याने लोकांमध्ये यासंबंधी चर्चा होत आहे.

याप्रकरणी तक्रार झाल्यावर निवडणूक अधिकारी सक्रीय झाले आहेत. नोटांचा हार परिधान करण्याचा प्रकार भारतीय चलनाचा अपमान आहे. याचबरोबर कारवर विधायक असे लिहिलेले आहे, या दोन्ही प्रकारांमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने भाजप उमेदवाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अमीलाल यादव यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.