आमदार किरण सामंत यांची पेंडूर मांड उत्सवाला भेट
05:34 PM Jan 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कट्टा / वार्ताहर
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा 14 दिवशीय त्रैवार्षिक मांड उत्सवास भेट देऊन श्री देव वेताळाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुळकर्णी, संतोष परब, रामू सावंत, मनोज राऊळ, पिंट्या परब, बाबू कांबळी, जयद्रथ परब, व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पेंडूर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार किरण सामान यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, देऊन सत्कार करण्यात आला.
Advertisement
Advertisement