ऊस दराबाबत लवकरच तोडगा ! खर्डा भाकरी स्विकारत आमदार डॉ. विनय कोरेंचे आश्वासन
वारणानगर / प्रतिनिधी
लवकरच ऊस दराबाबत तोडगा निघेल तशी चर्चा सुरु असल्याची माहिती तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी चर्चेवेळी सांगत शेतकऱ्यांच्या आवडीची खर्डा भाकरी मी स्वीकारत असल्याचे सांगितले.
जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत झालेल्या निर्णयानुसार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 'खर्डा भाकरी शिदोरी' आंदोलन जिल्ह्यात झाले. आज दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी आज येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट घेवून त्यांना खर्डा भाकरी ची शिदोरी दिली यावेळी आ. कोरे यानी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी गतहंगामातील ऊसाला प्रतिटन ४०० रुपये आणि या हंगामातील ऊसासाठी ३५०० रुपये प्रतिटन रुपये दर देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ विनय कोरे म्हणाले, शेतकरी हे कारखान्याचे मालक असल्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. दराबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, संपतराव पवार, पन्हाळा तालुकाध्यक्ष अजित पाटील, शिवाजी आंबेकर, आण्णा मगदूम, सुधीर मगदूम, सुनील सुर्यवंशी, उमेश पाटील, सुरेश शिर्के, हरिश पाटील, तानाजी पाटील, बाबासाहेब पाटील, संभाजी पाटील, राहूल पाटील, बंडा पाटील, मानसिंग मोहिते, महावीर पाटील, सुधीर पाटील, सुशांत जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.