महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आमदार अपात्रताप्रकरणी लवकर निकाल लावावा

12:17 PM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाची सभापतींना तोंडी सूचना : 6 मे रोजी होणार पुढील सुनावणी

Advertisement

पणजी : काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या आठ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.  न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने गोव्याच्या सभापतींना अपात्रता याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, असे तोंडी निर्देश दिले असल्याची माहिती याचिकादार चोडणकर यांनी दिली. चोडणकर यांनी गोवा विधानसभेच्या अध्यक्षांना गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली अपात्रता याचिका कालबद्ध वेळेत निकाली काढण्याचे निर्देश देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयासमोर केली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आठ आमदारांविऊद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यात सभापतींच्या कथित अपयशामुळे, चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी, चोडणकर यांची बाजू मांडणारे डॉ. अभिषेक संघवी यांनी अपात्रतेच्या याचिका दाखल करून सुमारे दीड वर्षे उलटून गेली तरी त्यावर कोणताही निर्णय न होणे असुंक्तिक आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सभापतींना त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. सभापती रमेश तवडकर यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने अपात्रता याचिकेवर काहीसा उशीर झाला असल्याचा निष्कर्ष काढला, आणि सभापतींनी अपात्रता याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे तोंडी सांगितले. पुढील सुनावणी आणखी तीन आठवडयांनी म्हणजे 6 मे  रोजी  घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.  काँग्रेसच्या दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, अॅलेक्स सिक्वेरा, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस आणि संकल्प आमोणकर या आठ आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर चोडणकर यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article