कबूलायतदार गावकर जमिनींच्या मोजणीचे काम तात्काळ हाती घ्यावे
आमदार दीपक केसरकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना
सावंतवाडी । प्रतिनिधी
आंबोली ,चौकुळ, गेळे कबूलायतदार गावकर जमीन भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणीचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना आमदार दीपक केसरकर यांनी आजच्या बैठकीत दिल्या. आंबोली गावाची विशेष बैठक या संदर्भात घेतली जाईल तसेच २० लाख रुपये खर्च करून आमदार निधीतून मोजणीसाठी यंत्र पुरवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. चौकूळच्या जमीन सर्वेक्षण व मोजणीचे काम सुरू करण्याच्या सूचना केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या . यावेळी त्यांनी या जमिनीचा प्रश्न सुटला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या नावे जमीन मोजणी व सर्वेक्षण पूर्ण करून लवकरात लवकर जमिनी नावे करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया हाती घेण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्याधिकारी मकरंद देशमुख ,प्रांताधिकारी हेमंत निकम ,तहसीलदार श्रीधर पाटील, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सरपंच श्वेता पालेकर,. सागर ढोकरे, वामन पालेकर. ,पांडुरंग गावडे ,तुकाराम गावडे, दिनेश गावडे आदी उपस्थित होते.