For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार भैरती बसवराज यांना अटकेची भीती

06:17 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमदार भैरती बसवराज यांना अटकेची भीती
Advertisement

विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

गुंड शिवप्रकाश उर्फ बिल्कू शिवू याच्या खूनप्रकरणी केआर पुरम मतदारसंघातील भाजप आमदार भैरती बसवराज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे भैरती बसवराज यांना अटकेची भीती fिनर्माण झाली आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करणारे विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी जामीन अर्ज फेटाळून लावल्याचा आदेश जारी केला.

Advertisement

भैरती बसवराज यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी बेंगळूर येथील लोकप्रतिनिधी न्यायालयात झाली. भैरती बसवराज यांच्यावतीने वकील संदेश चौट यांनी तर सीआयडीच्यावतीने एसपीपी अशोक नाईक यांनी युक्तिवाद केला. खटला दाखल होऊन पाच महिने आणि 10 दिवस झाले आहेत. 18 आरोपींविऊद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हत्येच्यावेळी सात ते आठ आरोपी अज्ञात होते. तथापि, एफआयआरमध्ये भैरती बसवराज यांचा उल्लेख ए-5 म्हणून करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयावरून त्याचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट केले आहे.

प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित झाल्यानंतर सोमवारपर्यंत सीआयडीने नोटीस किंवा समन्स जारी केलेले नाही, तर मी चौकशीसाठी कसा हजर राहू शकतो? एफआयआरमध्ये माझे नाव समाविष्ट करण्याव्यतिरिक्त त्यांनी आणखी काय केले आहे? पाच महिन्यांपासून गप्प असलेले आता चौकशी आवश्यक असल्याचे म्हणत आहेत. एफआयआर नोंदवल्यानंतर कोका कायदा लागू करत आहेत. भैरती बसवराज कोणत्याही चौकशीसाठी तयार असून जेव्हा त्यांना बोलावले जाईल तेव्हा ते चौकशीसाठी येतील, असा युक्तिवाद वकील संदेश चौट यांनी केला.

Advertisement
Tags :

.