आमदार आसिफ सेठ यांची बुडा अध्यक्षपदी निवड
08:05 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेळगाव : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले आमदार आसिफ सेठ यांची सरकारने बेळगाव बुडाचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तसा अधिकृत आदेश राज्य सरकारच्या कनिष्ठ कार्यदर्शी लता के. यांनी मंगळवारी सायंकाळी जारी केला आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून बुडा अध्यक्ष म्हणून लक्ष्मण चिंगळी कार्यरत होते. बुडा अध्यक्षपदासाठी वाल्मिकी समाजाचे नेते राजशेखर तळवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांची बुडा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आमदार आसिफ सेठ हे बुधवारीच आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली
Advertisement
आहे.
Advertisement