For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केपे पोलिस स्थानक 15 दिवसांत सुरू करा; अन्यथा धरणे आंदोलन : आमदार एल्टन डिकॉस्टा

01:56 PM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
केपे पोलिस स्थानक 15 दिवसांत सुरू करा  अन्यथा धरणे आंदोलन   आमदार एल्टन डिकॉस्टा
Advertisement

केपे : केपे येथील पोलिस स्थानकाचे काम गेल्या साडेचार वर्षांपासून रखडले असून, ते येत्या 15 दिवसांत सुरू करण्यात यावे, अन्यथा नागरिकांसह धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी प्रशासनाला दिला.

Advertisement

केपेतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी केपे उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोलिस स्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर नागरिकांनी रॅली काढत रखडलेल्या पोलिस स्थानकाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी स्थानकाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले की, केपे पोलिस स्थानकाचे काम गेल्या साडेचार वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांना प्रभावी पोलिस सेवा मिळण्यासाठी हे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे.

Advertisement

येत्या 15 दिवसांत कामाला सुरुवात झाली नाही, तर नागरिकांसह तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. नागरिकांनीही पोलिस स्थानकाचे काम आणखी विलंब न लावता तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

Advertisement
Tags :

.