For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिझोराममध्ये आता ललदुहोमांचे सरकार

06:50 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
मिझोराममध्ये आता ललदुहोमांचे सरकार
Advertisement

माजी ‘आयपीएस’ मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/ ऐझवाल

झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते ललदुहोमा यांनी शुक्रवारी मिझोरामचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांनी राजधानी ऐझवाल येथील राजभवन संकुलात ललदुहोमा आणि इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याआधी बुधवारीच ललदुहोमा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. ‘झेडपीएम’ने राज्यातील 40 पैकी 27 जागा जिंकून एमएनएफ आणि काँग्रेसचा पराभव केला होता.

Advertisement

माजी आयपीएस ललदुहोमा यांनी झोरम राष्ट्रवादी पार्टी नावाचा पक्ष स्थापन करत ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. दुसरीकडे, ललदुहोमाच्या पक्षाने राज्यातील इतर पाच छोट्या पक्षांसोबत युती केली. त्यानंतर त्या युतीचे राजकीय पक्षात रुपांतर होऊन 2017 मध्ये झेडपीएम नावाचा पक्ष उदयाला आला. अवघ्या पाच वर्षात राज्यात अव्वल कामगिरी करत त्यांच्या पक्षाने आता सत्ता हातात घेतली आहे.

ललदुहोमा यांची ओळख

मिझोराममधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या झेडपीएमचे अध्यक्ष ललदुहोमा हे मिझोरामचे माजी आयपीएस अधिकारी आहेत. 1972 ते 1977 पर्यंत ललदुहोमा यांनी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य साहाय्यक म्हणून काम केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ललदुहोमा यांनी झोराम पीपल्स मुव्हमेंट  पक्षाला बहुमत मिळवून देण्यात मोठे यश प्राप्त केले आहे. युवकांमध्ये यांची लोकप्रियता अधिक असल्याचे मानले जाते. माजी आयपीएस अधिकारी असणाऱ्या ललदुहोमा हे एकेकाळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षाप्रमुख होते. ही नोकरी सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला. 1984 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. 2018 च्या निवडणुकीत ते ऐझवाल पश्चिम 1 आणि सरचिप या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत सरचिप मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. 2018 पासून ते झोराम पीपल्स मुव्हमेंट या पक्षाच्या नात्याने निवडणूक लढवित आहेत. ते सध्या 74 वर्षांचे आहेत.

Advertisement
Tags :

.