मित्सुबिशी टीव्हीएस मोबिलीटीत 32 टक्के हिस्सेदारी घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जपानमधील टेडिंग हाऊस मित्सुबिशी कॉर्प लवकरच भारतात कार विक्री व्यवसायात पदार्पण करणार आहे. निक्केई एशिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्सुबिशी कंपनी भारतातील कार विक्री प्रमुख टीव्हीएस मोबिलीटीमध्ये 32 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करणार असल्याचे समजते.
दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात करार झाला असून टीव्हीएस मोबिलीटी आपला कार विक्री व्यवसाय बंद करणार असून मित्सुबिशी यात 32 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. 33 दशलक्ष ते 66 दशलक्ष डॉलरमध्ये हा व्यवहार होणार असून याला अद्याप नियामकाची परवानगी मिळणे बाकी आहे. मित्सुबिशी कंपनी टीव्हीएस मोबिलीटीच्या 150 हून अधिक आऊटलेटसचा वापर करुन प्रत्येक कार ब्रँडसाठी त्याला वाहिलेली शोरुम बनवणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात होंडा कार्सची विक्री वाढवण्यावर पंपनीचा जोर असेल. भारतात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मित्सुबिशी प्रयत्न करणार आहे. तशी वाहनेही सादर केली जाणार असल्याची माहिती आहे.
भारत तिसऱ्या स्थानावर
जागतिक कारच्या विक्रीच्या आकडेवारीचा विचार केल्यास भारत सध्याला तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. जगात सर्वाधिक कार विक्री करण्यात पहिल्या दोन स्थानांवर चीन आणि अमेरिका हे देश आहेत. जपानला कार विक्रीच्या स्पर्धेत फारसं यश साध्य करता आलेलं नाही.