मिथून, संस्कार, तन्वी अंतिम फेरीत
06:45 AM Dec 07, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / गुवाहाटी
Advertisement
येथे सुरू असलेल्या गुवाहाटी मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत मिथून मंजुनाथ आणि संस्कार सारस्वत यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल तर महिलांच्या एकेरीत तन्वी शर्माने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
Advertisement
पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीच्यासामन्यात मिथून मंजुनातने आपल्याच देशाच्या तुषार सुवीरचा 22-20, 21-8 तर संस्कार सारस्वतने इंडोनेशियाच्या त्रियानसहाचा 21-19, 21-9 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या एकेरीतील उपांत्य सामन्यात तन्वी शर्माने जमानच्या हिना अकेचीचा 21-18, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 42 मिनिटांत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता तन्वी आणि चीन तैपेईची टाँग यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
Advertisement
Next Article