महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आसनसलोमध्ये मिथुन चक्रवर्ती विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा?

06:19 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तृणमूलकडून सिन्हा यांना उमेदवारी जाहीर : भाजपकडून अनेक नावे चर्चेत

Advertisement

वृत्तसंस्था/ आसनसोल

Advertisement

पश्चिम बंगालमधील सर्वात हायप्रोफाइल मतदारसंघांपैकी एक आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु भाजपकडून मिथुन चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे मानले जात आहे.

पश्चिम वर्धमानच्या नेत्यांसोबत बंद दाराआड झालेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी सिन्हा यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आसनसोलमध्ये पुन्हा विजय मिळेल या अपेक्षेसह सिन्हा यांना उमेदवारी देण्याची तृणमूलची योजना आहे. सिन्हा यांनी 2022 मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत या मतदारसंघात 3 लाख मताधिक्यासह विजय मिळविला होता. तर त्यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला होता.

या मतदारसंघात भाजपच्या वतीने अग्निमित्रा पॉल तसेच जितेंद्र तिवारी यांच्या नावांचीही चर्चा आहे. 2022 च्या पोटनिवडणुकीत सिन्हा यांच्या विरोधात पॉल यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु त्यांचा मोठा पराभव झाला होता.  आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी देखील भाजपचे उमेदवार असू शकतात. आसनसोलमध्ये बंगाली आणि बिगरबंगाली भाषिक मतदारांची संख्या जवळपास समान आहे. तिवारी यांची हिंदीभाषिक मतदारांवरही चांगला प्रभाव आहे. तसेच ते यापूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये राहिले असल्याने ते त्या पक्षाची रणनीति उत्तमप्रकारे समजून घेऊ शकतात असे भाजपचे मानणे आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात चित्रपट कलाकाराला उमेदवारी दिल्यास भाजपला चांगली आघाडी मिळू शकते अशीही चर्चा आहे. अशा स्थितीत भाजपकडे मिथुन चक्रवती यांच्यासारखा स्टार नेता उपलब्ध आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत चक्रवर्ती यांनी भाजपसाठी जोरदार प्रचार केला होता. आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी असल्याने पक्षाला सिन्हा यांच्यासारखा बाहेरील उमेदवार द्यावा लागत असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article