‘स्वीट ड्रीम्स’मध्ये मिथिला पालकर
ओटीटीवर पाहता येणार चित्रपट
ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वीट ड्रीम्स हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री मिथिला पालकर आणि अमोल पाराशर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 24 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.‘जहां सपने शुरू होते हें, वहीं से शुरू होती है केनी और दीया की कहानी’ अशी कॅप्शन देत चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्टर मुखर्जीने केले आहे. या चित्रपटात मेयांग चांग आणि सौरसेनी मैत्रादेखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची निर्मिती ज्योति देशपांडे, नेहा आनंद आणि प्रंजल खंधदिया यांनी केली आहे. मिथिलाला लिटिल थिंग्स सीरिजमधील भूमिकेसाठी ओळखले जाते. तसेच ती त्रिभंगा या चित्रपटात काजोलसोबत दिसून आली होती. अमोल हा टीव्हीएफ ट्रिपलिंगमुळे लोकप्रिय झाला आहे. स्वीट ड्रीम्स ह चित्रपट कल्पना आणि वस्तुस्थिती दरम्यानच्या रेषेला पुसट करणाऱ्या कहाणीवर आधारित आहे.