महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मिचेल मार्श मायदेशी रवाना

06:40 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श याच्या उजव्या हाताचा स्नायू दुखावल्याने या दुखापतीवर वैद्यकीय इलाज करण्यासाठी तो तातडीने मायदेशी रवाना झाला. मार्शच्या या समस्येमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला फार मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

येत्या जून महिन्यात विंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिचेल मार्शवर यापूर्वीच टाकण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मार्शने आपला शेवटचा सामना 3 एप्रिल रोजी कोलकाता संघाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला या दुखापतीमुळे मुंबई आणि लखनौ विरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मार्शने 23 धावा जमविल्या होत्या. त्यामुळे दिल्लीने हा सामना 12 धावांनी जिंकला होता. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मार्शला खातेही उघडता आले नव्हते. 2023 च्या जानेवारीपासून 32 वर्षीय मार्शने 38 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50.10 धावांच्या सरासरीने 1954 धावा जमविल्या असून त्यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजीत 10 गडी बाद केले आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article