For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेब्बाळकर यांच्याकडून मंत्रिपदाचा गैरवापर

10:45 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेब्बाळकर यांच्याकडून मंत्रिपदाचा गैरवापर
Advertisement

भाजपची पोलीस आयुक्तांकडे तक्रार : अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून मंत्रिपदाचा गैरवापर केला जात आहे. मंत्रिपदाच्या ताकदीवर अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, भाजप नेत्यांना लक्ष्य करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना पक्षाच्या कामासाठी प्रवृत्त करण्याचे काम मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून सुरू आहे. यावर निर्बंध घालून हेब्बाळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा भाजपच्यावतीने मंगळवारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली. हेब्बाळकर यांच्याकडून भाजप नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी केली जात आहे. माजी आमदार संजय पाटील यांच्या घरावर भाडोत्री गुंडांना पाठवून धुडगूस घालण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या सोबतच्या एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भाजप नेते व कार्यकर्ते प्रचार करू नये, यासाठी त्यांच्यावर बिनबुडाचे व चुकीचे आरोप केले जात आहेत. संजय पाटील यांच्या घरासमोर धुडगूस घातलेल्या गुडांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.  बेळगावचे पोलीस आयुक्त इडा मार्टीन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी, राज्यपाल, केंद्रीय निवडणूक आयोग, जिल्हा पोलीसप्रमुख यांना पाठविण्यात आल्या. यावेळी बेळगाव भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी जिल्हाध्यक्ष एम. बी. जिरली, महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, संदीप देशपांडे, राजशेखर डोणी यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.