For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये नागरिकांशी गैरवर्तन?

06:19 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये नागरिकांशी गैरवर्तन
Advertisement

डोळ्यांवर पट्टी, बांधलेले हात, अर्धनग्न शरीर असलेली छायाचित्रे जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ गाझा सिटी

इस्रायल-हमास युद्धादरम्यान सोशल मीडियावर गाझामधील काही छायाचित्रे समोर येत असून त्याद्वारे इस्रायली लष्करावर गंभीर आरोप केले जात आहेत. इस्रायली सैन्याने काही पॅलेस्टिनी नागरिकांना ताब्यात घेत त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे युरो-मेडिटेरियन ह्युमन राइट्स मॉनिटरने एका निवेदनात म्हटले आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. या नागरिकांना इस्रायली सैनिकांनी का अटक केली याबाबतही अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Advertisement

सध्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखविण्यात येत असलेल्या छायाचित्रांमध्ये गाझामधील काही लोक अर्धनग्न स्थितीत गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. काही छायाचित्रांमध्ये गाझातील नागरिकांना लष्करी ट्रकमध्ये नग्नावस्थेत बसण्यास भाग पाडले जात असल्याचे दिसत आहे. छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या काहींची ओळख पटली असून त्यांचा कोणत्याही अतिरेकी गटाशी संबंध नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

इस्रायली सैन्याने डॉक्टर, शिक्षक, पत्रकार आणि वृद्ध पुऊष तसेच विस्थापित व्यक्तींना मनमानी अटक करण्यास सुऊवात केली आहे, असे युरो-मेडिटेरेनियन मॉनिटरने आपल्या निवेदनात म्हटले आहे. इस्रायली मीडियामध्ये अटक करण्यात आलेल्या लोकांचे वर्णन हमासचे लढवय्ये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही.

Advertisement
Tags :

.