For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणविरोधी अभियानात मिस्ट मेमचा मृत्यू

06:14 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणविरोधी अभियानात मिस्ट मेमचा मृत्यू
Advertisement

इस्रायलची कबुली : मोसादने गमावला स्वत:चा एजंट

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या एका एजंटवरून मोठा खुलासा झाला आहे. इराणविरोधी इस्रायलच्या अभियानात या एजंटने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. इस्रायली एजंटचा मे 2023 मध्ये इटलीतील एका नौका दुर्घटनेत मृत्यू झाला होता अशी माहिती मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी बुधवारी दिली आहे.

Advertisement

ही एजंट केवळ त्यांच्या नावाचे पहिले हिब्रू अक्षर मेमने ओळखली जाते. तिचा मृत्यू इटलीच्या मॅगी गोर सरोवरात नौका उलटल्याने झाला होता. त्यावेळी मृत एजंटची ओळख 50 वर्षीय एरेज शिमोनी अशी इटलीच्या प्रसारमाध्यमांनी केली होती, हे एक टोपणनाव मानले जाते. तिची खरी ओळख अधिकृत स्वरुपात सार्वजनिक करण्यात आली नाही. परंतु इस्रायलच्या अधिकृत स्मारक वेबसाइट्सवर तिची कामगिरी नमूद आहे.

देशासाठी स्वत:चे जीवन समर्पित

ऑपरेशन रोअरिंग लायनदरम्यान माझे विचार आणि माझे हृदय मेमचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्यांवरून गर्वाने भरून गेले होते. मेम इस्रायलबाहेर स्वत:च्या कर्तव्यांचे पालन करताना हुतात्मा झाल्या असे मोसाद मुख्यालयात आयोजित स्मृती दिनाला संबोधित करताना बार्निया यांनी सांगितले आहे.

मेमच्या नेतृत्वात अभियान

मेमच्या नेतृत्वात राबविणत आलेले अभियान रचनात्मक, चतुरपणा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मिश्रण होते, यामुळे इराणविरोधी अभियानाच्या यशावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. याच अभियानाने अलिकडच्या इस्रायल-इराण युद्धादरम्यान इस्रायलच्या यशात योगदान दिल्याचे बार्निया यांनी स्पष्ट पेले.

इटलीच्या माध्यम अहवालांमधील खुलासा..

-इटलीच्या प्रसारमाध्यमांनुसार दुर्घटनाग्रस्त झालेल्या नौकेवर गुप्तचर हस्तकांची एक कार्यबैठक सुरू होती.

-नौकेवरील 23 जणांपैकी 19 जण हे वर्तमान किंवा पूर्वाश्रमीचे इस्रायली आणि इटालियन गुप्तचर हस्तक होते.

-दुर्घटनेत मारले गेलेल्या अन्य दोन जणांमध्ये 62 वर्षीय पुरुष आणि 53 वर्षीय एक महिला सामील होती.

-मेमचे पार्थिव इस्रायलमध्ये आणले गेले, अश्केलोन सैन्य दफनभूमीत पूर्ण सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले.

-मेमवरील अंत्यसंस्कारावेळी मोसादचे वरिष्ठ अधिकारी तसेच डेव्हिड बार्नियाही उपस्थित राहिले होते.

पूर्ण जीवन गुप्तसेवेत

मेम मूल्यांना जपणारी व्यक्ती, खरी मैत्रिण, समर्पित अन् प्रामाणिक व्यक्ती होती. तिने स्वत:चे पूर्ण प्रौढ जीवन गुप्तसेवेत घालविले. मृत्यूनंतरही आम्ही सार्वजनिक स्व्रुपात तिच्या महत्त्वपूर्ण अन् लाभदायक कार्यांचा खुलासा करू शकणार नाही. मेम ही नवोन्मेष क्षेत्र आणि संचालनाच्या नव्या पद्धतींमध्ये अत्यंत तरबेज होतील असे बार्निया यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.