कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेपत्ता तरुणीचा प्रियकराकडून खून

11:25 AM Aug 31, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

शहरानजीकच्या मिरजोळे गावातून गेल्या 2 आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या भक्ती जितेंद्र मयेकर (26, मिरजोळे नाखरेकरवाडी) या तऊणीचा पोलीस यंत्रणा व तिच्या नातेवाईकांमार्फत सर्वत्र शोध घेतला जात होता. दरम्यान संशयित प्रियकर असलेल्या तऊणाला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने खंडाळा येथे तिचा खून करून आंबा घाटात निर्जन ठिकाणी नेऊन मृतदेह फेकून दिला होता. शनिवारी सायंकाळी दिवसभराच्या तपासमोहिमेनंतर मृतदेह शोधून काढण्यात यश आले. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर दुर्वास पाटील याच्यासह तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

Advertisement

ही घटना सुमारे दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. भक्ती मयेकर ही तरुणी 17 ऑगस्टपासून घरातून मैत्रिणीकडे जाते, असे सांगून निघून गेली होती, असे दाखल तक्रारीत म्हटले आहे. तेव्हापासून ती घरी न परतल्याने आणि तिचा मोबाईलही बंद लागत असल्याने कुटुंबियांनी मित्र, मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे तसेच रत्नागिरी शहर परिसरात शोध घेतला. परंतु ती कोठेही सापडली नाही. त्यामुळे हताश झालेल्या मुलीच्या कुटुंबियांतील तिचा भाऊ हेमंत जितेंद्र मयेकर यांने तक्रार दिली. यावरून रत्नागिरी शहर पोलिसात 21 ऑगस्ट रोजी बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपास सुरू झाला.

बेपत्ता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भक्तीचा शोध सुरू केला. भक्तीचे बेपत्ता होण्यापूर्वीचे मोबाईल लोकेशन काढण्यात आले. 16 ऑगस्टला भक्ती खंडाळा येथे गेल्याचे निष्पन्न झाले. भक्ती ज्याच्याशी वारंवार बोलत असे तो तिचा प्रियकर खंडाळा येथेच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कुटुंबियांच्या दाखल तक्रारीवरून शहर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे हाती घेतली. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुऊवातीला उडवाउडवीची उत्तरे देत आपल्याला काहीच माहिती नाही, भक्ती आपल्या येथून निघून गेली, असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी चातुर्य दाखवत प्रियकराकडून हत्येची कबुली करून घेण्यात यश मिळाले. दरम्यानच्या तपासात त्याची सखोल चौकशी सुरू केली. त्या दरम्यान संशयितांने त्या तऊणीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली.

संशयित आरोपीच्या कबुलीमुळे स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तत्काळ आंबा घाटाकडे शनिवारी धाव घेतली. तेथे तऊणीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिवसभर घाट परिसरातील या प्रकाराचा उलगडा करण्यात सारी यंत्रणा गुंतली होती. अगदी सायंकाळपर्यंत पोलिसांचे मृतदेह शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू होते. सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास संशयितांने दिलेल्या माहितीवरून केलेल्या तपासानंतर पोलिसांच्या तो हाती लागला. हातावरील टॅटूवरून ओळख पटली.

भक्ती मयेकर ही तऊणी फायनान्स सेक्टरमध्ये नोकरी करत होती. त्यामुळे तिचे वास्तव्य रत्नागिरी शहरात होते. याचदरम्यान खंडाळा येथील देशी बार मालकाशी तिची ओळख झाली. ओळखीचे ऊपांतर प्रेमात झाले. प्रेमप्रकरण सुरू असतानाच प्रियकराचा दुसऱ्या तऊणीशी विवाह ठरल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर तिने प्रियकरासोबत वाद घालण्यास सुऊवात केली. गेले काही दिवस त्यांच्यामध्ये वाद सुरू होते.

भक्ती मयेकर ही तालुक्यातील खंडाळा येथील प्रियकराच्या देशी बारजवळ 16 ऑगस्ट रोजी गेली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या ठिकाणी दुसऱ्या तऊणीसोबत विवाह ठरल्यानंतर प्रेयसीने जाब विचारताच बारच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत दोघांमध्ये वाद झाला. आपली फसवणूक करू नको, असे भक्ती प्रियकराला सांगत होती. यातून हा वाद विकोपाला गेला. प्रियकराने खोलीतच भक्तीचा गळा आवळून खून केला. भक्ती निपचित पडल्यानंतर मृतदेहाचे करायचे काय? असा प्रश्न प्रियकराला पडला. मात्र तोपर्यंत रात्र झाली होती.

भक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या प्रियकराने बारच्या मॅनेजरसह एका कारचालकाची मदत घेतली. खंडाळा येथे मृतदेह गाडीत भरून त्यांनी थेट आंबा घाट गाठला. आंबा घाटातून मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला. त्यानंतर पुन्हा खंडाळा येथे ते परतले.

भक्तीचा मृतदेह आंबा घाटात टाकल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सुमारे 150 पोलीस कर्मचारी आंबा घाटात दाखल झाले. ताब्यात घेतलेल्या संशयिताने दाखविलेल्या ठिकाणापासून पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. शनिवारी सायंकाळी उशिरा भक्तीचा मृतदेह सापडला.

घरातून मैत्रिणीकडे जाते, असे सांगून गेलेल्या भक्तीच्या कुटुंबियांनी रत्नागिरी शहरातील मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेण्यासाठी मोठा आटापीटा केला. पण तिचा खून झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळताच कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली आणि त्यांना जबर धक्का बसला. नातेवाईकांनी पोलिसांसमवेत घटनास्थळाकडे धाव घेतली. तऊणीचा मृतदेह समोर येताच साऱ्यांच्याच भावनांचा बांध फुटला. ऐन गणेशोत्सवात या घडल्या घटनेने खळबळ उडाली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article