For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोडोलीतील बेपत्ता वृद्धेचा मृतदेह वारणा नदीत तिसऱ्या दिवशी सापडला : घातपाताचा संशय

10:17 AM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोडोलीतील बेपत्ता वृद्धेचा मृतदेह वारणा नदीत तिसऱ्या दिवशी सापडला   घातपाताचा संशय
Advertisement

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली ता.पन्हाळा येथील श्रीमती हौसाबाई नामदेव राबाडे वय ८५ रा. कोटेश्वर मंदिराजवळ या दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह वारणा नदी पात्रात निलेवाडी ता. हातकणंगले हद्दीत सापडला असून सदर वृद्धेच्या अंगावर असलेले सोने गायब झाल्याने तिचा घातपात झाल्याची चर्चा घटनास्थळी चालू होती.

Advertisement

श्रीमती हौसाबाई या शुक्रवार दि. २१ रोजी सायंकाळी ६ वाजता घरात कोणालाही न सांगता निघून गेल्यापासून नातेवाईक त्यांचा शोध घेत होते आज शनिवार दि. २२ रोजी त्यांचे सुपूत्र उत्तम नामदेव राबाडे यांनी कोडोली पोलीस ठाण्यात श्रीमती हौंसाबाई बेपत्ता झाल्याची वर्दी दाखल केली होती.

आज रविवार दि.२३ रोजी दुपारी वारणा नदी पात्रात निलेवाडी हद्दीत श्रीमती हौसाबाई यांचा मृतदेह तरंगताना आढळून आलेवर लगेच नातेवाइकांना बोलवून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली पारगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. हावलदार परिट तपास करीत आहेत.

Advertisement

दरम्यान श्रीमती हौसाबाई राबाडे यांच्या अंगावर सोन्याच्या पाटल्या व बोरमाळ होती मृतदेह आढळला त्यावेळी सोने नव्हते त्यामुळे सोन्याच्या दागिन्यासाठी त्यांचा घातपात झाला असावा अशी शंका घटनास्थळी व्यक्त होत होती.

Advertisement
Tags :

.