For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारिवडे येथील बेपत्ता वृद्ध तब्बल चार दिवसानंतर सापडले

02:58 PM Feb 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कारिवडे येथील बेपत्ता वृद्ध तब्बल चार दिवसानंतर सापडले
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले कारिवडे लिंगवतवाडी येथील चंद्रकांत लिंगवत (वय ७५) हे वृद्ध रविवारी सकाळी घरापासून अर्धा किलोमीटरवर कारिवडे - ओटवणे सीमे दरम्यान सापडले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा विश्वास टाकला.चंद्रकांत लिंगवत हे बुधवार १८ फेब्रुवारी सायंकाळी वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. गेले चार दिवस कारिवडे ग्रामस्थांनी परिसरात शोधाशोध केली मात्र ते सापडले नव्हते. अखेर रविवारी सकाळी शोधाशोध सुरू असतानाच बागायतीच्या कुंपणाकडे बसलेल्या अवस्थेत ग्रामस्थांच्या ते दृष्टीस पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सावंतवाडीत नेण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.