कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिका-सौदीदरम्यान क्षेपणास्त्र विक्री करार

06:24 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी महत्त्वाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेने सौदी अरेबियाला 3.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 29 हजार कोटी रुपये) किमतीच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या विक्रीला मान्यता दिली आहे. या करारांतर्गत अमेरिका सौदी अरेबियाला हवेतून हवेत मारा करणारी एआयएम-120सी-8 प्रगत क्षेपणास्त्रs, त्यांची मार्गदर्शन प्रणाली आणि तांत्रिक सहाय्य पुरविणार आहे. ही क्षेपणास्त्रs अमेरिकन कंपनी आरटीएक्स कॉर्पद्वारे तयार केली जातील. ट्रम्प प्रशासनाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव आता अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडला जाणार असून सभागृहातील खासदार त्यावर चर्चा करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प पहिल्याच परदेश दौरा सौदी अरेबियाला जाणार आहेत. या दौऱ्यात हा करार अधिकृतपणे मंजूर केला जाऊ शकतो. ट्रम्प यांचा दौरा 13 मे रोजी सुरू होणार आहे. या भेटीत ते कतार आणि युएईलाही भेट देतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article