महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराकमध्ये अमेरिकेच्या सैनिकांवर क्षेपणास्त्र हल्ला

06:53 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इराणचे समर्थनप्राप्त गटावर आरोप  

Advertisement

वृत्तसंस्था/ बगदाद

Advertisement

इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला असून यात अनेक सैनिक जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या हल्ल्यामागे इराणचे समर्थनप्राप्त गट असल्याचा आरोप केला आहे. हा हल्ला पश्चिम इराकमधील अमेरिकेच्या अल असद वायुतळावर झाला आहे.

इराणचे समर्थनप्राप्त सैन्यगटांनी अनेक रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रs डागली हीत. यातील अनेक क्षेपणास्त्रs आकाशातच नष्ट करण्यात आली होती. परंतु काही क्षेपणास्त्रs वायुतळावर कोसळली आहेत. अमेरिकेच्या वायुतळावरील हल्ल्यापूर्वी इराणने इस्रायलवर सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये एका इमारतीवर हवाई हल्ला केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये इराणचे 4 सैन्य सल्लागार आणि सीरियातील इराणी सैन्याच्या मुख्य गुप्तचर अधिकाऱ्याचा समावेश होता.

याप्रकरणी इराणने सूड उगविण्याची धमकी दिली होती. इस्रायल-हमास युद्ध आता मध्यपूर्वेत फैलावू लागले आहे. इराण आणि अमेरिका थेट न लढता सीरिया आणि इराकमध्ये परस्परांच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यावर इराक-सीरियातील अमेरिकेच्या ठिकाणांवर 140 हून अधिक वेळा हल्ले झाले आहेत.

इराकचे पंतप्रधान अल सुदानी यांनी स्वत:च्या देशात आणखी अमेरिकन सैनिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या सैनिकांना इराकमधून बाहेर काढण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची गरज असल्याचे सुदानी यांनी म्हटले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील शत्रुत्वामुळे इराकमध्ये नवे युद्ध सुरू होऊ नये यासाठी सुदानी प्रयत्नशील आहेत. काही देश परस्परांमधील लढाईदरम्यान आमच्या भूमीचा गैरवापर करत आहेत. हा प्रकार आम्हाला मान्य नसल्याचे सुदानी यांचे सांगणे आहे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#akaluj #tarunbharatnews
Next Article