महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हूती बंडखोरांकडून जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला

06:22 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सौदीच्या दिशेने जाणारे जहाज लक्ष्य : युवराज सलमान भडकणार

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

येमेनच्या हुती बंडखोरांनी एडनच्या आखातातून जात असलेल्या एका मालवाहू जहाजावर शनिवारी रात्री उशिरा क्षेपणास्त्र हल्ला केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली आहे. इस्रायलकडून हमास नेता इस्माइल हानियेहला लक्ष्य करण्यात आल्यावर हुती बंडखोरांनी हा हल्ला केला आहे. हनियेहला हुती बंडखोरांचा पाठिराखा मानले जात होते.

हुती बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवरील हल्ले यापूर्वी रोखले होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गाझापट्टीत इस्रायलकडून कारवाई करण्यात आल्यावर हुती बंडखोरांनी यापूर्वी लाल समुद्रात जहाजांवर हल्ले करण्याचे सत्र आरंभिले होते. परंतु मागील काही महिन्यांमध्ये हे हल्ले थांबले होते.

एडनपासून सुमारे 225 किलोमीटर अंतरावर समुद्रात शनिवारी रात्री जहाजावर हल्ला झाला आहे. या जहाजाला एका क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य करण्यात आले. परंतु यामुळे जहाजाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसल्याचे ब्रिटिश सैन्याच्या युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरकडून सांगण्यात आले.

खासगी सुरक्षा कंपनी आम्ब्रेने देखील एडनच्या आखातात मालवाहू जहाजावर हल्ले झाल्याची माहिती दिली आहे. लायबेरियाचा झेंडा असलेले मालवाहू जहाज ग्रोटनला लक्ष्य करण्यात आले. हे जहाज संयुक्त अरब अमिरातच्या फुजैरा येथून सौदी अरेबियाच्या जेद्दा बंदराच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु ग्रोटनच्या व्यवस्थापकांकडून या हल्ल्याविषयी कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हुती बंडखोरांनी अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article