‘मिस वर्ल्ड’ला मिळतात करोडोंच्या सुविधा
मिस वर्ल्ड 2024 च्या ग्रँड फिनालेचे आयोजन करण्याची संधी भारतावर आली आहे. भारताला 28 वर्षांनंतर ही संधी मिळाली आहे, यापूर्वी भारताने 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. आता हा सोहळा बेंगळूर येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल 28 वर्षांनंतर भारताला या अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी फेमिना मिस इंडिया 2022 विजेती सिनी शेट्टी मिस वर्ल्ड 2024 भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेचे 140 हून अधिक देशांमध्ये थेट प्रक्षेपण होणार आहे.
‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतील सौंदर्यवती विजेत्याला केवळ हिरे आणि मौल्यवान जडजवाहिरांनी जडलेला मौल्यवान मुकुटच मिळत नाही, तर करोडो ऊपये आणि इतर सेवा-सुविधा मिळत असतात. मिस वर्ल्डच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मिस वर्ल्डच्या ताजची किंमत सुमारे 82 ते 83 लाख आहे. मात्र, ती हा ताज फक्त एका वर्षासाठी ठेवू शकते, कारण मिस वर्ल्डला तो पुढच्या वषीच्या विजेत्याला द्यायचा आहे. याचे प्रतीक म्हणून मुकुटाचा नमुनाही मिस वर्ल्डला दिला जातो.
‘ताज’ व्यतिरिक्त मिस वर्ल्डच्या विजेत्याला 10 कोटी ऊपयांचे बक्षीसही दिले जाते. मिस वर्ल्डचा ताज जिंकणाऱ्या स्पर्धकाला हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची आणि संपूर्ण वर्षभर मोफत वर्ल्ड टूर मिळते. याशिवाय मिस वर्ल्ड स्पर्धांना मेकअप, हेअर प्रॉडक्ट्स, शूज, कपडे, दागिने तसेच मेकअप आर्टिस्टला एक वर्षासाठी दिले जाते. यासोबतच ती मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनची ब्रँड अॅम्बेसेडरही असते.
सिनी शेट्टी ही फेमिना मिस इंडिया 2022 ची विजेती असून ती मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. वयाच्या अवघ्या 22 व्या वषी सिनी या पदावर पोहोचली असून संपूर्ण भारताच्या नजरा तिच्याकडे लागल्या आहेत. आत्तापर्यंत भारताने जगाला 6 मिस वर्ल्ड दिल्या आहेत. त्यात रीटा फारिया, ऐश्वर्या रॉय-बच्चन, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्लर यांची नावे आहेत.