महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट नोकर भरती प्रक्रियेत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका

06:35 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीबीआयकडून एफआयआर दाखल : पाच जणांच्या नावांचा उल्लेख

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी प्रत्येक उमेदवाराकडून 15 ते 25 लाख रुपये रक्कम घेण्यात आली आहे. शिपाई, वॉचमन, हमाल, कुली, चौकीदार, मजदूर या पदांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे  सीबीआयने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पाच अधिकारी व चौदा उमेदवार अशा एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2022-23 या वर्षात एकूण 29 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीपासूनच ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. भरती प्रक्रियेवेळी मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत नोव्हेंबर 2023 मध्ये सीबीआयने कॅन्टोन्मेंट बोर्डवर छापा टाकत अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली.

सीबीआयच्या पथकाने भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. प्रत्येक अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे चौकशी केली जात होती. या दरम्यान कॅन्टोन्मेंटचे सीईओ के. आनंद यांनी 25 नोव्हेंबर 2023 ला आपले जीवन संपविले. यामुळे काही दिवस थांबलेली सीबीआयची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली. प्रत्येक पदासाठी 15 ते 25 लाख रुपये घेण्यात आले होते.

भरती प्रक्रिया वादात

सॅनिटरी इन्स्पेक्टर, मेकॅनिक असिस्टंट, कुली, माळी, शिपाई, आया या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण देशभरातून अर्ज मागविण्यात आले. परंतु, केवळ बेळगावमध्येच अर्ज दाखल केलेल्यांना अंतिम नियुक्ती देण्यात आली. तसेच मर्जीतील नसलेल्या उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. नियुक्त केलेले उमेदवार हे अधिकाऱ्यांचे नातेवाईक, तसेच परिचयाचे असल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये स्पष्ट केले आहे.

संपूर्ण परीक्षा इंग्रजीमध्येच : पण, भाषा समजत नसल्याने संभ्रम

कॅन्टोन्मेंटचे कार्यालयीन अधीक्षक महालिंगेश्वर ताळूकर, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बसवराज गुडोडगी, डाटा एंट्री ऑपरेटर प्रकाश गौंडाडकर, मुख्याध्यापक परशराम बिर्जे, साहाय्यक शिक्षक उदय पाटील यांनी भरती प्रक्रियेमध्ये सीईओंच्या मार्गदर्शनाखाली मुख्य भूमिका बजावली होती. कॅन्टोन्मेंटचे तत्कालिन सीईओ के. आनंद यांनी पाच अधिकाऱ्यांच्या संगनमताने निवड प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी उमेदवारांकडून 15 ते 25 लाख रुपयांची लाच घेतल्याचे सीबीआयने नमूद केले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण परीक्षा पद्धती इंग्रजीमध्ये घेण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात यापैकी अनेक उमेदवारांना इंग्रजी भाषाच समजत नसल्याचे चौकशीमध्ये दिसून आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article