For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj Water Supply | मिरजकरांनो पाणी जपून वापरा! मुख्य पाईपलाईन सलग तिसऱ्यांदा फुटली; आज संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

05:25 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
miraj water supply   मिरजकरांनो पाणी जपून वापरा  मुख्य पाईपलाईन सलग तिसऱ्यांदा फुटली  आज संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद
Advertisement

मिरज : संपूर्ण मिरज शहराला पाणी पुरवठा करणारा कृष्णाघाट मुख्य जॅकवेल ते पाण्याच्या टाकीला जोडलेली ७११ मि.मी. व्यासाची मुख्य रायझिंग मेन पाईप दोन महिन्यात सलग तिसऱ्यांदा फुटली आहे. घाट परिसरातल टकले व शिष्टे यांच्याघराजवळ या पाईपला अचानक गळती लागल्याने तिच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आज मंगळवार २३ रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement

कृष्णा घाट येथून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी ७११ मि.मी. व्यासाची मुख्य रायझिंग मेन पाईपआहे. सदर पाईपला अचानक लिकेज (गळती) झाली आहे. शिवाजी टकले यांच्या घरामागील बाजूस व शिष्ट्ये यांच्या शेताजवळ ही तांत्रिक बिघाड झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदर पाइपलाईनची दुरुस्ती करणे अत्यंत तातडीचे आणि आवश्यक असल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.