For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj Crime | मिरज हादरले! भरदिवसा बंगला फोडून सव्वादोन लाखांचे दागिने लंपास

01:46 PM Apr 15, 2026 IST | NEETA POTDAR
miraj crime   मिरज हादरले  भरदिवसा बंगला फोडून सव्वादोन लाखांचे दागिने लंपास
Advertisement

                             मिरजेत भरदिवसा बंगल्याला चोरट्यांचा डल्ला

Advertisement

मिरज : शहरातील आदर्श घरकुल सोसायटी येथे बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख, ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.सोमवारी सकाळी दहानंतर ही घटना घडली. याबाबत जयंत धनंजय भिंताडे (वय ५८) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आदर्श घरकुल सोसायटी प्लॉट नं. एक येथे जयंत भिंताडे यांचा अविष्कार नावाने बंगला आहे. सोमवारी सकाळी ते बंगल्याला कुलूप लावून बाहेर गेले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते घरी आल्यानंतर बंगल्याचा
कडाकायडा तुटल्याच दिसला.

Advertisement

त्यांनी आत जावून पाहणी केल्यानंतर दोन लाख, २५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि सात हजार रुपयांची चांदी असा दोन लाख, ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.भिंताडे हे कुटुंबियांसह बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून भरदिवसा चोरी केल्याचे दिसून आले. याबाबत भिंताडे यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली.

पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.याबाबत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा उच्चभ्रू वस्तीत बंगला फोडून चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement
Tags :

.