Miraj Crime : मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याला लाचखोरीचे ग्रहण; सहा लाखांची लाच घेताना एपीआय अटकेत
मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील भ्रष्टाचाराने खळबळ
मिरज : मिरज तालुक्याच्या पूर्वभागातील २५ ते २७ गावांचा डोलारा सांभाळणाऱ्या मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याला सध्या लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. गंभीर प्रकरणातील बड्या गुन्हेगारांना सहीसलामत सोडण्यासाठी पोलिसांनी जणू रेटकार्डच बनविले आहे. खुद्द निरीक्षकांकडे तपास असलेल्या एका गुन्ह्यातील हद्दपार प्रस्तावित असलेल्या आरोपीला अटक टाळण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सहा लाखांची लाच घेऊन पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
उफाळत चाललेले अवैधधंदे, खासगी सावकारीमुळे उध्वस्त होणारे गोरगरीबांचे संसार, वाढती नशेखोरी, गुन्हेगारी आणि अवैध तस्करी गंभीर बाब बनली असताना पोलिसांची क्राईम डायरी मात्र निरंक असते. याचाच अर्थ पोलिसांचे हात लाचखोरीने बरबटल्यामुळे अनेक प्रकरणांची गेटवरच तडजोड सुरू असल्याचे स्पष्ट होते.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र तसे अवाढव्य आणि व्यापक. बेडग, मंगसुळी, म्हैसाळ सारख्या कर्नाटक सीमा भागाला जोडलेल्या गावात अवैध धंद्यांसह प्रतिबंधित दारु व गुटख्याच्या तस्करीला उत आलेलाच आहे. निवडणुका आल्या की चेकनाका लावून पोलिस खुप मोठी कामगिरीकेल्याचा बनाव करतात. मात्र, वास्तवात या तस्करीला आजतागायत आळा घालता आला नाही. मालगांव, सुभाषनगर सारख्या गावात सर्वात मोठ्या मटका बुकी चालतात. जुगार अह्यांचे फड रंगतात. शेतातील आंतरपिकात गांजा उगवतो, मात्र स्थानिक ग्रामीण पोलिसांना याची माहिती नसते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांना स्वतः छापा टाकावा लागतो. यावरुनच ग्रामीण पोलिसांची कार्यपध्दत आणि क्षमता प्रकषनि दिसून येते.
पूर्वी शे-पाचशे, हजार-पंधराशेवर समाधान मानणारे पोलिस आता लाखांचे गड्ढे खिशात कोंबून सद्रक्षणाय, खलनिग्रहणायचा मंत्र जपत आहेत. दोन दिवसांपूर्वी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा लावला. सहा
लाखांची लाच स्वीकारताना संशयीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गुरवला रंगेहात पकडले. एका प्रकरणातील आरोपीवर हद्दपारीचा प्रस्ताव असताना आणि त्याच प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षकांकडे असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकाने तब्बल सहा लाखांची लाच स्विकारुन पोलिस दलाला उघडे पाडले. या लाच प्रकरणात पैसे घेणारा कनिष्ठ आणि डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणारा बरिष्ठ का असू नये? असा सवाल उपस्थित झाला आहे.
सहा लाखांच्या लाचेने पोलिस प्रशासनातील खाबुगिरीचा पिचका करुन बसलेल्या संशयीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गुरवचे कारनामेही थोडेथोडके नाहीत. मुळात त्याच्याकडे मालगांव कार्यक्षेत्राची जबाबदारी. मात्र हा गुरव सलगरेपासून बेडगेपर्यंत हातपाय पसरलेला पोलिस. मालगांवमध्ये त्याने यापूर्वी अनेकवेळा जुगार अड्क्यावर कारवाई करुन आपल्या मासिक हफ्त्याची सोय करुन ठेवली. काहीवेळा कागदोपत्री कारवाई दाखवण्यासाठी त्याने निष्पापांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काही दिवसांपूर्वी त्याने मालगांव येथे एका जुगार अड्यावर छापा टाकला. गरीबांच्या गाड्या पोलिस ठाण्यात आणल्या. अन् श्रीमतांच्या गाळ्या कारवाई न करता जाग्यावरच सोडून दिल्या. ज्यांच्या गाड्या पकडल्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही, म्हणून सहानुभूती