For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj News | मिरज वैद्यकीय महाविद्यालय हादरले! विद्यार्थिनीचा मानसिक छळ करणाऱ्या प्राध्यापकाची तडकाफडकी बदली

04:45 PM Apr 24, 2026 IST | NEETA POTDAR
miraj news   मिरज वैद्यकीय महाविद्यालय हादरले  विद्यार्थिनीचा मानसिक छळ करणाऱ्या प्राध्यापकाची तडकाफडकी बदली
Advertisement

                  मिरज मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीचा मानसिक छळ

Advertisement

मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीचा प्राध्यापकाकडून मानसिक छळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधीत विद्यार्थीनीने नगरसेवक सागर वनखंडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. सदर तक्रारीनंतर कारवाईचा धसका घेतलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकाची इतर विभागात तातडीने बदली केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर प्राध्यापकाचे निलंबन होण्याचीहीशक्यता आहे.

पिडीत विद्यार्थीनी ही मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तेथीलच एक प्राध्यापक पिडीत विद्यार्थीनीला लक्ष करुन वारंवार त्रास देत होता. रात्री-अपरात्री उशिरा फोन करणे, शिक्षणाबाहेरील विषयांवर संभाषण करण्यास भाग पाडणे तसेच वैयक्तीकआयुष्यात हस्तक्षेप करणे असा गंभीर प्रकार सुरू होता. प्राध्यापकाच्या या गैरकृत्याबाबत पिडीत विद्यार्थीनीने नगरसेवक सागर वनखंडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तातडीने पुढाकार घेत महाविद्यालयाच्या वरिष्ठांना भेटून पिडीतेची आपबिती सांगितली. स्थानिक पातळीवर संबंधीत प्राध्यापकावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर शासकीय महाविद्यालय प्रशासनाला जाग आली असून, संबंधीत प्राध्यापकाची तातडीने इतर विभागात बदली करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.