For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj News | काझी विरुद्ध शेख टोळीत मोठा भडका! भररस्त्यात कोयते अन् रॉड घेऊन फिरणाऱ्या ५ भाईंच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

04:59 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
miraj news    काझी विरुद्ध शेख टोळीत मोठा भडका  भररस्त्यात कोयते अन् रॉड घेऊन फिरणाऱ्या ५ भाईंच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Advertisement

                                           मिरजमध्ये टोळी संघर्ष उफाळला

Advertisement

मिरज - टाकळी रस्त्यावरीलटोळीतील सदस्य शिव अथणीकर याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याच्या टोळीतील पाच संशयीत हत्यारे घेऊन फिरताना आढळून आले. पोलिसांनी या पाचही जणांना अटक करुन त्यांच्याकडून दोन कोयता, एक रॉ ड आणि दुचाकी जप्त केली आहे. अटक केलेल्यांमध्ये गोविंद सदाशिवराव नाईक (रा. दिंडीवेस, मिरज), रिहान तौफिक शिकलगार (रा. सतारमेकर गल्ली, मिरज), राजू अजीज मुल्ला (रा. दत्त कॉलनी, मिरज), अनिश अल्ताफ सौदागर (रा. शिंदे हॉलजवळ, सुभाषनगर) आणि अल्फाज अखिल मुल्ला (रा. अमननगर, मिरज) अशा पाचजणांचा समावेश आहे.

शिव अथणीकर या तरुणावर टाकळी रस्त्यावर हल्ला झाला होता. शहरातील मतिन काझीसह त्याच्या टोळीने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. काझी आणि अमननगर येथील एजाज शेख या टोळीमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद आहेत. याच कारणातून काझी टोळीने शिव अथणीकर याच्यावर हल्ला केल्यामुळे अथणीकर हा शेख टोळीतील असल्यामुळे टोळीतील समर्थक बदला घेण्यासाठी काझी टोळीवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. सदरची माहिती मिळताच पोलिसांनी दिंडीवेस, मालगांव रस्ता व अमननगर या भागात संशयितांचा शोध घेतला. पाच जण दुचाकी सह थांबले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.