कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangali : मिरजेतील जीर्ण उड्डाणपुलाला लाली लिपस्टिक, नवीन पुलाचा विषय बारगळा

02:59 PM May 08, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

डागडुजीमुळे उड्डाणपुलाचे काही वर्षे आयुर्मान वाढमार असल्याचा दावा करण्यात आलाय

Advertisement

मिरज : सांगली-मिरज शहराचा सेतु असलेला कृपामायीजवळील रेल्वे उड्डाण पूल बांधकामाचा विषय पुन्हा एकदा बारगळल्याचे दिसत आहे. सदरचा पूल धोकादायक असल्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल येऊन दीड वर्षे लोटले तरी नवीन पूल बांधकामाच्या तसेच पर्यायी पूल उभारण्याच्या हालचाली झाल्या नाहीत. आता याच जीर्ण झालेल्या पुलाला कार्बन फायबर या रसायन मिश्रीत रंगाने रंगवून तसेच पडझड झालेल्या जागा मुजवून लाली लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Advertisement

सदरच्या डागडुजीमुळे उड्डाणपुलाचे काही वर्षे आयुर्मान वाढमार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील कृमापायी रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. दीड वर्षांपूर्वी मध्य रेल्वे विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. सदरचा पूल जीर्ण झाल्याने मोठी दुर्घटना होण्याची संभावना व्यक्त करून तातडीने नवीन पूल बांधकामाचा पर्याय स्थानिक प्रशासनाता सुचविला होता.

तत्कालीन जिल्हाधिकारी मतांडा राजा दयानिधी यांनी पूल बांधकामासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्तावही पाठवला होता. मध्य रेल्वेच्या पुणे मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतकरणाचे काम पूर्ण झाल्याने पुलाखालून २५ हजार होल्टेजी विद्युत लाईन गेली आहे. त्यामुळे सदर धोकादायक पूल नव्याने बांधण्याच्या हालचालीही सुरु होत्या.

राज्य व केंद्र सरकारकडून निधीची तरतूद करण्याची घोषणाही केली होती. मात्र, सांगली-मिरज रस्त्याला जोडणारा कृमापायी उड्डाणपूल हा एकमेव मार्ग असल्याने सदरचा पूल पाडण्याआमी पर्यायी रस्त्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात होती. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने नागरिकांच्या सुचनेनुसार पर्यापी पूल बांधकामानंतरच कृमापायी पूल पाडला जाईल, अशी ग्वाही दिल्ली होती. त्यानंतर पूल बांधकामासंदर्भात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

सध्या धोकादायक असलेल्या याच पुलावरुन सर्रासपणे अवजड वाहनांत्तह सर्व प्रकारची वाहतूक सुरूच आहे. सध्या रेल्वे प्रशासनाने या जुन्याच उड्डाणपूलाच्या नूतनीकरण कामाला सुरुवात केली आहे. आधुनिक पद्धतीने कार्बन फायबर या रसायन मिश्रीत रंगातून पुलाचा खालील माग रंगवला जात आहे. फायबर रसायनाने पुलाचे सुमारे दहा वर्षे आयुर्मान वाढण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यासाठी कर्नाटक निपाणी येथील पार्शवा कंपोझिट या कंपनीला काम दिले असून, ६० टक्के डागडुजीचे काम पूर्ण झाले आहे. नवीन उड्डाण पुलासाठी सळई, सिमेंट, काँक्रीट वाळू, असे मटेरियल वापरावे लागते. त्याचा खर्च कोट्यवधीत जातो. मात्र जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी आधुनिक पद्धतीचे कार्बन फायबर मटेरियल वापरण्यात येत आहे. दिवसा रेल्वे गाड्यांची वर्दळ जास्त असल्यामुळे रात्रीच्या सुमारास टप्याटप्याने मेगा ब्लॉक करून हे काम करण्यात येत आहे.

रसायनाचा कच्चा माल उत्तर कोरियातून मागवून निपाणीत त्याचे मटेरियल तयार करण्यात येत आहे. या उड्डाण पुलाला पाच वे आहेत तर २० कॉलम आहेत. आतापर्यंत २ वेचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कॉलमचे काम पूर्ण झाले काहे. अद्याप तीन व चारचे काम बाकी आहे. याठिकाणी रेल्वेची मेन लाईन आणि ऑफ लाईन आहे.

त्यामुळे मेन लाईनची मेगा ब्लॉक करून उर्वरित केले जात आहे. यासाठी पुणे विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अद्याप मंजुरी मिळाली नसल्यामुळे राहिलेल्या कामाला विलंब होत आहे. सदरचे काम पूर्ण होण्यासाठी अजूनही दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

मिरज विभागाचे रेल्वेचे असिस्टंट डिव्हिजन अभियंता सरोज कुमार आणि सीनिअर सक्शन अभियंता बीरेंद्र कुमार हे या कामाची देखरेख करत आहेत. दरम्यान, जीर्ण झालेते पूल पाडून नवीन पूत उभारणे गरजेचे असताना प्रशासनाकडून वारंवार धोकादायक पुलालाच लाली लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. जीर्ण पुलामुळे मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल केला जात आहे.

Advertisement
Tags :
@sanglinews#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediamiraj newsRailway breach
Next Article