कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Miraj Civil Hospital: सोनोग्राफीसाठी निघालीये, हातात कागद बघितला अन्... सुरक्षा रक्षकांना दिला चकवा

05:06 PM May 06, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

मुळात प्रसूतीपश्चात विभागात महिला रुग्णाच्या गळ्यात एक ओळखपत्र असते

Advertisement

मिरज : डोस पाजण्याच्या बहाण्याने अर्भकाला अनोळखी महिलेने १६ नंबर वॉर्डात नेले. गेटवरून एक्झिट होताना सुरक्षा रक्षकांनी अडविले. तिने सांगितले सोनोग्राफीला चाललेय. महिलेच्या हातात कागद बघितला. सुरक्षा रक्षकांनाही खरे वाटले अन् त्यानंतर गेट उघडून महिलेसह बाळासह रुग्णालयाच्या बाहेर सोडल्याचे चौकशीतून समोर आले आहे. मुळात प्रसूतीपश्चात विभागात महिला रुग्णाच्या गळ्यात एक ओळखपत्र दिलेले असते.

Advertisement

सुरक्षा रक्षकांनी ओळखपत्राची पडताळणी न करता केवळ कागदावर विश्वास ठेवल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अक्ष्यम्य चुकीचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेने वैद्यकीय पंढरी हादरुन गेली. शासकीय रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. शासकीय रुग्णालयाच्या अध्यापक अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली असून, या समितीकडून सखोल चौकशी सुरू आहे. आज दिवसभरात चौकशीचा अहवाल येणार आहे.

दरम्यान, चौकशी सुरू असतानाच सिव्हीलमधील सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचे एक एक नमुने समोर येत आहेत. प्रसूती पश्चात विभागात एक महिला तीन दिवसांपासून फिरत होती. सांगोला तालुक्यातील कोळे गावच्या महिला रुग्णाशी तिने ओळख वाढवली. मुलगा जन्मला. तीन दिवसाचे बाळ त्याची आई झोपून होती. संबंधीत महिलेने याचीच संधी हेरली.

बाळाला डोस पाजण्यासाठी १६ नंबर वॉर्डात बोलविल्याचे सांगून सर्व महिला मुख्य गेटजवळ आली. तेथे बंदूकधारी सुरक्षा रक्षक होते. महिलेला अडविले. चौकशी केली. महिलेने सांगितले की बाळाला सोनोग्राफीला घेऊन जातेय. महिलेच्या हातात कागदपत्रे होती. सुरक्षा रक्षकांना खरे वाटले. सुरक्षा रक्षकांनी खोलवर चौकशी किंवा खात्री न करता तसेच महिलेची ओळखही न विचारता तिला गेट उघडून सोडून दिले. अन् महिला ऑटो रिक्षातून बाळाला घेऊन पसार झाली.

केवळ एका कागदाच्या आधारावर भामट्या महिलेने दिवसाढवळ्या सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात अक्षरशः माती घातली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम केले असते तसेच महिलेची ओळख विचारुन रुग्णालयाकडून दिलेले ओळखपत्र तपासले असते तर कदाचित ही घटनाच घडली नसती. आता चौकशी समितीकडून आज दिवसभरात अहवाल प्राप्त होणार आहे. यामध्ये काही दोषींची नावे नमुद आहेत. त्यावर सिव्हील प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

गळ्यात नव्हता पास...

प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता श्रीकांत हंकारे यांनी सांगितले की, ६४ नंबरच्या प्रसूती पश्चात विभागात दाखल असलेल्या प्रत्येक महिला रुग्णाच्या गळ्यात शासकीय रुग्णालयाचे ओळखपत्र (पास) असते. सदर पास गळ्यात असल्याशिवाय बाळ अथवा बाळंतीनीला रुग्णालयाबाहेर जाता येत नाही. असे असतानाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कागदावर विश्वास ठेवून महिलेला बाहेर सोडले. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेमके कोणत्या प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते? असा सवाल आहे. ओळखपत्र तपासणे आवश्यक असताना सुरक्षा रक्षकांनी एका कागदावर विश्वास ठेवलाच कसा? असा सवालही केला जात आहे.

Advertisement
Tags :
#crime news#sangali#sangali news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediamiraj civil hospital
Next Article