कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Miraj Civil Hospital चे बळी ठरले कंत्राटीच, कायम कर्मचाऱ्यांना वाचवण्याची बेफिकीरी

03:39 PM May 09, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

आरोग्य व्यवस्थेतील वरिष्ठांच्या डोळेझाकीमुळे हे प्रकार वाढत आहेत

Advertisement

सांगली : मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयात कायम कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून कंत्राट दादांकडील कामगारांना बळी देण्याच्या उद्योग वाढत चालले आहेत. बाळाच्या अपहरण प्रकरणात सुद्धा बॉर्ड मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सोडून कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर ठपका ठेवण्याचा उद्योग चौकशी समितीने केला आहे. यापूर्वी रुग्णांना रस्त्यावर मरायला सोडून देण्याच्या प्रकरणात सुद्धा असेच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला बळी देऊन दवाखान्याने वेळ मारून नेली होती.

Advertisement

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेतील वरिष्ठांच्या डोळेझाकीमुळे हे प्रकार वाढत चालले आहेत. मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या बॉर्ड मधून नवजात बालकाला उचलून परागंदा झालेल्या महिलेला पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी ही महिला सापडलीच नसती किंवा प्रदीर्घकाळ उन्हात फिरवल्याने बाळाला इजा पोहोचली असती तर या प्रकरणाने खूपच गंभीर वळण घेतले असते.

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात असलेल्या बेफिकीर वातावरणाचा हा मोठा पुरावा आहे. केवळ सुरक्षारक्षकांची जबाबदारी आहे असे म्हणून रुग्णालय प्रशासन आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहे. सुरक्षारक्षकांची जबाबदारी ही वॉर्डच्या बाहेर आणि त्यांची नेमणूक येथे केलेली आहे त्या ठिकाणची असते. बार्ड मधून एखादी महिला बाळाला उचलून आणत असताना तेथे कायम कर्मचाऱ्यांपैकी किंवा डॉक्टरांपैकी कोणालाही विचारणा करावीशी वाटली नाही याचे कारण काय याचे उत्तर रुग्णालय प्रशासनाने दिलेले नाही.

या ठिकाणी नेमणुकीस असणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांची जबाबदारी आहे किंवा नाही याबद्दल देखील अद्याप काहीही मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले नाही. चौकशी समितीत या व्यक्तींचा दोष काय आहे याबद्दल कोणतीही वाच्यता झालेली नाही. वॉर्ड मध्ये असणारे ब्रदर सिस्टर यांना अशी एक महिला वार्डमध्ये फिरत आहे याची शंका का आली नाही असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. 

या सगळ्यामागे मुख्य कारण आहे ते रुग्णालयातील कायम कर्मचारी आणि डॉक्टरांना इथे घडणाऱ्या कोणत्याही हालचालीशी आपला संबंध नाही आपण केवळ आपल्याला नेमून दिलेल्या कामाच्या वेळेत जमेल तितके काम करणार अशी वृत्ती असल्याने अशा घटना घडत आहेत. बाळ पळवण्याच्या प्रकरणामुळे काय सुरू आहे कळते तरी इथे दररोज घडणाऱ्या घटनांवर संघटीतरित्या पांघरून घातले जाते. कर्मचाऱ्यांमध्ये असणाऱ्या ठराविक लोकांची अरेरावी, त्यांच्याकडून संघटित रित्या आणल्या जाणाऱ्या दबाब प्रसंगी डॉक्टरांना सुद्धा दमात घेण्याची पद्धत यामुळे चालते कोणाचे?

असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या विरोधात आवाज उठवणे म्हणजे आपल्या विरोधात एखाद्या षड्यंत्रला निमंत्रण देणे असल्याने कोणीही या टोळ्यांच्या नादाला लागत नाही. परिणामी अशा बेफिकिर लोकांचे अनेक वॉर्डींमध्ये प्राबल्य झाले आहे. उपचाराला येणारा वर्ग सर्वसामान्य आणि गरीब असल्याने या लोकांची तक्रार करायची तर आपल्यावर उपचार होणार नाही किंवा हे लोक संघटित रित्या काही तक्रार करून आपल्याला वार्ड मधून हाकलून लावतील म्हणून लोक तक्रार करत नाहीत. पण त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बोल लावणे, त्यांच्यावर खेकसणे असे प्रकार घडत आहेत.

रुग्ण फेकल्याच्या प्रकरणाशी साम्य

नोव्हेंबर २०१९ मध्ये तीन अत्यवस्थ मनोरुग्ण व्यक्तींना उपचार बंद करून सांगलीत आणून एका निर्जनस्थळी कचरा कोंडाळ्यावर फेकून वेण्यात आले होते. कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांनी आरडाओरडा केला. जवळपासच्या काही नागरिकांनी त्या लोकांना कुत्र्यापासून वाचवून दवाखान्यात वाखल केले.

त्या प्रकरणात रुग्णाला उपचार पूर्ण झाले नसताना बाहेर काढणाऱ्याची ऑर्डर वेणारे डॉक्टर, या रुग्णांवरील उपचार थांबविण्यासाठी दबाव आणणारे कायम कर्मचारी, रुग्णाला बाहेर काढून खाजगी कर्मचाऱ्याला रिक्षात घालून बाहेर दूर ठिकाणी फेकून वेण्याचे आवेश वेणारे प्रशासनातील व्यक्ती यांच्यावर रुग्णालयाने कोणतीही कारवाई केली नाही. नंतर या प्रकरणात नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही मध्ये वार्डमध्ये काम करणारा सफाई विभागाचा कंत्राटी कर्मचारी या रुग्णांना बाहेर घेऊन गेला आणि त्याने फेकून दिले असे सीसीटीव्हीच्या रेकॉर्डवरून ठरवले.

पोलिसांनी देखील कोणताही तपास न करता रुग्णालय व्यवस्थापनाला सहाय्य करत कंत्राटी कर्मचाऱ्याला बळीचा बकरा ठरवले. वास्तविक या प्रकरणांमध्ये कंत्राटी सफाई कामगार हा फरशी पुसायचे काम करणारा आणि किरकोळ मदतनीस होता. त्याला या रुग्णाचा काही त्रास होण्याचे कारण नव्हते आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर वार्डातून तो हे रुग्ण घेऊन जात असताना आणि खाजगी गाडीतून त्यांना बाहेर काढत असताना कोणीही रोखले नाही.

सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडूनच त्याला रिक्षाचे भाडे वेण्यात आले आणि ते रुग्ण वाटेला लावले. पुढे यातील वोघांचा मृत्यू झाला. मात्र हे व्यवसायाला न शोभणारे अमानवी कृत्य करणारे डॉक्टर आणि कायम कर्मचारी मात्र वाचले. कोरोना काळामुळे त्यांच्या या गुन्ह्याकडे समाजाचे दुर्लक्ष झाले आणि आता पुन्हा त्याच मार्गाने प्रशासन चालले आहे.

Advertisement
Tags :
@sanglinews#miraj#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacontract workersmiraj civil hospital
Next Article