For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मीराबाई चानूचे ऑलिम्पिक तिकिट आरक्षित

06:36 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मीराबाई चानूचे ऑलिम्पिक तिकिट आरक्षित
Advertisement

वृत्तसंस्था/ फुकेत (थायलंड)

Advertisement

येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या विश्वचषक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूने ब गटातील 49 किलो गटात तिसरे स्थान मिळविले. पण तिने येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट आरक्षित केले.

दुखापतीमुळे तब्बल 6 महिने तिला वेटलिफ्टिंग क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. या स्पर्धेत महिलांच्या 49 किलो ब गटात मीराबाईने क्लिनमध्ये 81 तर जर्कमध्ये 103 किलो असे एकूण 184 किलो वजन उचलत तिसरे स्थान मिळविले. चानूने पॅरिस ऑलिम्पिकसाठीची पात्रता मर्यादा गाठल्याने ती या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व पुन्हा करेल. 2017 साली मीराबाई चानूने 49 किलो गटात विश्वविजेतेपद मिळविले होते. या वजन गटात मीराबाई सध्या मानांकनात दुसऱ्या स्थानावर आहे. या गटात चीनची जियान हुईहुआ पहिल्या स्थानावर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात सहभागी होणारी मीराबाई चानू ही भारताची एकमेव महिला वेटलिफ्टर आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.