For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

06:58 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक
Advertisement

 आशियाई स्पर्धेत मिळविले पहिले पदक, स्कीट नेमबाजी संघ, जय मीना,  बॅडमिंटन संघ यांना कांस्यपदके

Advertisement

वृत्तसंस्था / नागोया (जपान)

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही वैयक्तिक गटात भारताला सुवर्णपदक मिळवता आले नाही, तरीही पदकांची कमाई सुरूच राहिली, बुधवारी भारताने एकूण 5 पदके पटकविली. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, स्किट नेमबाजीत महिला व पुरुष संघाला, सॉफ्ट टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये कांस्यपदके मिळाली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसांनंतर भारताकडे आता एकूण 12 पदके (एक सुवर्ण, पाच रौप्य आणि 6 कांस्य) जमा झाली आहेत. नेमबाजीतून आणखी दोन संघाला पदके मिळाल्याने पुन्हा एकदा भारतासाठी पदके मिळवून देणारे सर्वात मोठा क्रीडा प्रकार ठरला आहे.

Advertisement

स्टार भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने अखेर तिच्या झगमगत्या ट्रॉफी कॅबिनेटमधील एक मोठी उणीव भरून काढली. 12 वर्षांची प्रतीक्षा, थोडक्यात हुकलेले विजय आणि निराशेनंतर, तिने महिलांच्या 49 किलो वजनी गटात आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्य विजेत्या चानूने एकूण 198 किलो (88+111 किलो) वजन उचलून, 1998 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने जिंकलेल्या कांस्यपदकानंतर भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले वेटलिफ्टिंग पदक पटकावले. तिने 83 किलो वजनाने आपल्या स्नॅच सिरीजची सुरुवात केली, त्यानंतर 85 आणि 87 किलो वजन सहजपणे उचलून स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केला. क्लीन अँड जर्कमध्ये, चानूने तिच्या पहिल्याच प्रयत्नात 107 किलो वजन अगदी सहज उचलले. त्यानंतर तिने 111 किलो वजन उचलले. रौप्यपदक निश्चित झाल्यामुळे, तिने शेवटचा प्रयत्न केला नाही. उत्तर कोरियाची दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन रि साँग गम हिने सुवर्णपदक मिळवित हॅट्ट्रिक साधली. तिने एकूण 215 किलो (94+121) वजन उचलत जेतेपद पटकावले. स्नॅच व क्लीन-जर्कमध्ये तसेच एकूण वजनात तिने नवा विश्वविक्रम नोंदवला. इंडोनेशियाच्या लुलुक डायना ट्रि विजयाना हिने 191 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले.

भारतीय पुरुष, महिला स्किट संघाला कांस्य

महिलांच्या सांघिक स्कीटमध्ये रायझा ढिल्लन, महेश्वरी चौहान आणि परिनाझ धालीवाल या भारतीय त्रिकुटाने 331 गुणांसह सुवर्णविजेते चीन (357) आणि कझाकस्तान (336) यांच्यामागे तिसरे स्थान मिळवले. अनंतजीत सिंग नरुका, अनुभवी मैराज अहमद खान आणि भवतेघ सिंग गिल यांनी एकूण 346 गुणांसह पुरुषांच्या सांघिक कांस्यपदकावर आपले नाव कोरले. वैयक्तिक अंतिम फेरीसाठीही पात्र ठरलेल्या अनंतजीतने 125 पैकी 119, मैराजने 116, तर भवतेघने 111 गुण मिळवले. तत्पूर्वी, परिनाझ आणि रायझा या दोघींनी 125 पैकी 111 गुण मिळवले, तर महेश्वरीने 109 गुण नोंदवले. भारताकडे आता नेमबाजीत चार रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळाली आहेत.

जय मीनाला सॉफ्ट टेनिसचे कांस्य

जय मीनाने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या ताकुया कुरोसाकाकडून पराभव पत्करल्यानंतर कांस्यपदक पटकावून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले सॉफ्ट टेनिस पदक मिळवले. आपल्या तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना, 26 वर्षीय मीनाने तीन गेमने मागे पडल्यानंतर जोरदार पुनरागमन केले, परंतु त्याला ती लय टिकवता आली नाही आणि 45 मिनिटांच्या या लढतीत तो कुरोसाकाकडून 2-4 (3-5, 1-4, 1-4, 4-1, 6-4, 1-4) ने पराभूत झाला. मीनाला सुरुवातीला आपला लय साधण्यासाठी संघर्ष करावा लागला, कारण कुरोसाकाने पहिले दोन गेम 5-3 आणि 4-1 ने जिंकून आघाडी घेतली होती. दिवसाच्या सुरुवातीला, मीनाने एका अत्यंत चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यात फिलिपिन्सच्या शेर्विन नुगिटचा 4-3 (0-4, 4-2, 2-4, 4-2, 5-3, 2-4, 7-5) असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मीनाने 2018 आणि 2022 च्या आशियाई खेळांमध्येही सहभाग घेतला होता.

पुरुष बॅडमिंटन संघाला कांस्य पदक

पुरुष दुहेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज रंकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी विद्यमान विश्वविजेते लियांग वेईकेंग आणि वांग चांग यांचा 21-11, 22-20 असा पराभव करत भारताचा एकमेव विजय नोंदवला. लक्ष्य सेन सलामीच्या सामन्यात शी युकीकडून 21-16, 21-18 ने पराभूत झाला. त्यानंतर आयुष शेट्टी जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेल्या ली शी फेंगकडून 21-19, 21-13 ने पराभूत झाला, ज्यामुळे चीनला 2-1 अशी आघाडी मिळाली. भारताला चौथ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक असताना, हरिहरन आमसाकरुणन आणि एम. आर. अर्जुन यांना जी टिंग आणि लिऊ यी यांच्याकडून 21-16, 17-21, 21-9 ने पराभूत झाली, ज्यामुळे भारताच्या सलग दुसऱ्यांदा पुरुष सांघिक अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. हांगझू 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेल्या भारताने सलग दुस्रयांदा पदक पटकावले.

पदक जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरले : मीराबाई चानू

मी गेल्या 12 वर्षांपासून या पदकाचा पाठलाग करत होते. या पदकाने माझे आयुष्य आता पूर्ण झाले असून मला खूप हलके वाटत आहे. ही एक स्वप्नवत आशियाई क्रीडा स्पर्धा ठरली आहे. या रौप्य पदकामुळे माझ्या पदकसंख्येत आणखी भर पडली आहे, ज्यात मला याआधी एक ऑलिम्पिक रौप्य, एका सुवर्ण पदकासह तीन विश्व चॅम्पियनशिप पदके, अनेक राष्ट्रकुल खेळ आणि चॅम्पियनशिप विजेतेपदे आणि एक आशियाई चॅम्पियनशिप कांस्य पदकांचा समावेश आहे. पण आशियाई खेळांमध्ये वारंवार रिकाम्या हाताने परतावे लागले होते आणि ते माझे स्वप्न 2026 मध्ये पूर्ण झाले आहे, असे चानू स्पर्धेनंतर  वृत्तसंस्थले महिती दिली.

देशाला निर्धार आणि सातत्य कायम प्रेरणा देणारे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चानूच्या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आणि म्हणाले की, तिचा निर्धार आणि सातत्य देशाला सतत प्रेरणा देत आहे.  मिराबाई चानूसाठी एक विशेष रौप्यपदक! महिलांच्या 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचा निर्धार आणि सातत्य देशाला सतत प्रेरणा देत राहील. भारताला तिचा अभिमान आहे. तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Advertisement
Tags :

.