For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि सळीने मारहाण; आटपाडीत संतापजनक प्रकार उघड

12:07 PM May 18, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि सळीने मारहाण  आटपाडीत संतापजनक प्रकार उघड
Advertisement

                                  आटपाडीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने खळबळ

Advertisement

आटपाडी : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न करून जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्तापित करून तिला मारहाणीची घटना आटपाडी सोमेश्वर नगर येथे घडली. याप्रकरणी चमेली दौलुशा पवार, आदित्य उर्फ नाना दवलुशा पवार (रा.सोमेश्वर नगर आटपाडी), सुरज दीपक शिंदे (रा.फोंड तुळजापूर जि. धाराशिव) आणि कृष्ण पवार (रा. सोमेश्वर नगर आटपाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचीनावे आहेत.

आटपाडी येथील पिडीत १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न लावुन दिले. सदरची मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतानाही तिचे लग्न जबरदस्तीने कृष्ण पवार याच्याशी लावुन दिले. कृष्ण पवार याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. पिडीत मुलीला सळीने मारहाण केली.

Advertisement

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न लावणे, तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिला मारहाण करण्याच्या प्रकरणात चमेली दौलुशा पवार, आदित्य उर्फ नाना दवलुशा पवार, सुरज दीपक शिंदे, कृष्ण पवार यांचा सहभाग असल्याने पिडीतीने तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न लावणे, तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांवर यापुर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसाठी पोलीसांनी पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.