धक्कादायक, अल्पवायीन मुलीवर अत्याचार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
घटनेनंतर पीडित मुलीने तिच्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली
जत : तालुक्यातील नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या सोळा वर्षीय अल्पवायीन मुलीवर कामाच्या निमित्ताने बोलावून घेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दि. १६ मे रोजी रात्री ही घटना घडली आहे.
पीडित मुलीने आईला घटनेची माहिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुलीच्या आईने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एका सतरा वर्षीय मुलावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर संशयित अल्पवयीन आरोपीस मंगळवारी ताब्यात घेऊन सांगली येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपीने रात्री घरी कोणी नसल्याने पीडित मुलीला कामाचे निमित्ताने बोलावून घेतले.
तेथे तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने तिच्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
पीडित मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. तर मुलगा हा अकरावी मध्ये शिक्षण घेत आहे. यानंतर रविवारी सायंकाळी जत पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला सांगली येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लातुरे करत आहेत.