For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पवयीन मुलीवर सिक्कीममध्ये बलात्कार

06:32 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
अल्पवयीन मुलीवर सिक्कीममध्ये बलात्कार
Advertisement

8 जणांना अटक : पती-पत्नीचाही समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ गंगटोक

सिक्कीममधील ग्यालशिंगमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर अनेक महिने बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यात एक महिला, तिचा पती आणि चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान एका किशोरवयीन मुलीला अनेक महिने धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्याचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. बाल कल्याण समितीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आठही आरोपींना अटक केली.

Advertisement

सिक्कीममध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा सर्वांना धक्का बसला आहे. मुलीला सध्या बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्यायिक संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिक्कीममधील या घटनेनंतर देशातील बलात्काराच्या घटनांबाबत केंद्र सरकारला लवकरच ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.