अल्पवयीन मुलीवर 600-700 जणांकडून बलात्कार
पाकिस्तानी ग्रूमिंग गँगवर ब्रिटनच्या खासदाराचा धक्कादायक खुलासा : पोलिसांनी निष्काळजीपणा दाखविल्याचे उघड
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील खासदार रुपर्ट लो यांनी संसदेत भाषणाद्वारे केलेल्या खुलाशामुळे संघटित बाल लैंगिक शोषणाचा (ग्रूमिंग गँग्ज) मुद्दा पुन्हा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पीडित मुलींची आपबीती संसदेसमोर मांडून सरकारने याप्रकरणी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी लो यांनी केली आहे. एका 13 वर्षीय पीडितेवर 2-3 वर्षांच्या काळात 600-700 पुरुषांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला आहे.
एका मुलीसोबतच्या गैरवर्तनादरम्यान देशाच्या विविध हिस्स्यांमधील अनेक पोलीस अधिकारी तिच्यावरील बलात्कारात सामील होते. एका 15 वर्षीय मुलीच्या शीतपेयात गुंगी आणणारे औषध मिसळण्यात आले हेते. यानंतर आपल्यावर किती जणांनी बलात्कार केला, हे देखील तिला आठवत येत नव्हते.
ब्रिटनमधील अल्पवयीन मुलींना पाकिस्तानी ग्रूमिंग गँगकडून लक्ष्य केले जात होते. पाकिस्तानी ग्रूमिंग गँगकडून स्वत:च्या जाळ्यात अडकविण्यात आलेल्या या मुलींचे अनेक वर्षांपर्यंत लैंगिक शोषण करण्यात येत होते. एका व्हॅनमध्ये श्वानांच्या पिंजऱ्यांमध्ये 15-20 मुलींना कैद असल्याचे पाहिले होते, असे एका पीडितेकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानी ग्रूमिंग गँगचे सदस्य आम्हाला धमकावित होते, कुणासमोर वाच्यता केल्यास परिवारालाही ठार करू अशी धमकी देण्यात येत होती. पाकिस्तानी ग्रूमिंग गँग श्वेतवर्णीय आणि ख्रिश्चन मुलींना ‘कमी नैतिक मूल्यं असणाऱ्या’ मानत होती. तर मुस्लीम मुली उच्च नैतिकतायुक्त असल्याचे पाकिस्तानी ग्रूमिंग गँगकडून मानले जात होते, अशी आपबीती अनेक पीडितांनी मांडली आहे. एक पीडिता गरोदर राहिल्यावर गुन्हेगाराच्या पित्याने (जो इमाम होता) स्वत:च्या मुलासोबत विवाह करवून दिला होता.
पाकिस्तानी वंशाच्या गुन्हेगारांची टोळी
रुपर्ट लो यांनी मागील वर्षी कमीतकमी 85 क्षेत्रांमध्ये ग्रूमिंग गँग’शी स्वतंत्र चौकशी करविली होती. या टोळ्यांमध्ये मुख्यकरून पाकिस्तानी वंशाचे पुरुष सामील असून ते दशकांपासून याप्रकरणी सक्रीय असल्याचे चौकशीतून समोर आले होते. अहवालात सार्वजनिक संस्था आणि पोलिसांचा घोर निष्काळजीपणा उघड करण्यात आला होता.
यॉर्कशायरमधून समोर आले पहिले प्रकरण
हा मुद्दा सर्वप्रथम यॉर्कशायरच्या रोदरहम शहरात समोर आला होता. 1197-2013 दरम्यान तेथे 1400 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण झाले होते. प्राध्यापक एलेक्सिस जे यांच्या 2014 च्या अहवालानुसार वंशद्वेषाची भीती दाखवून याप्रकरणी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला नव्हता. असाच पॅटर्न रोशडेल, ऑक्सफोर्ड, टेलफोर्ड, ब्रिस्टलसमवेत सुमारे 50 शहरांमध्ये दिसून आला होता.
पीडितांची संख्या खूपच अधिक
2023 साली तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडून स्थापन बाल लैंगिक शोषण टास्कफोर्सने एका वर्षामध्ये 550 हून अधिक संशयितांना अटक केली होती. आकडेवारीनुसार 2023 मध्ये मुलींच्या विरोधात झालेले 1.15 लाखाहून अधिक लैंगिक गुन्हे नेंद झाले. ज्यातील 3.7 टक्के प्रकरणे ग्रूमिंग गँगशी संबंधित होती. 2024मध्ये ग्रेटर मँचेस्टरचे महापौर एंडी बर्नहॅम यांच्या स्वतंत्र समीक्षेने रोशडेलमध्ये 2004-12 दरम्यान मोठ्या प्रमाणात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी केली आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला सर्वांसमोर आणले होते.