For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी

10:55 AM May 09, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime news  अल्पवयीन मुलीवर अत्याचार  नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी
Advertisement

 न्यायालयाने दोषी ठरवत 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

Advertisement

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर सलग सहा वर्षे अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. दत्तात्रय बंडू गोरे (वय 53 रा. कात्यायनी ता. करवीर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

सरकारी वकील म्हणून प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले. गोरे याने अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिच्यावर जिह्यातील विविध ठिकाणी अत्याचार केले. सन 2013 पासून सन 2019 पर्यंत सलग सहा वर्षे अल्पवयीन पीडीतेच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिच्यावर अत्याचार केले.

Advertisement

तसेच या प्रकरणाची वाच्याता केल्यास तुझ्या आईला ठार मारेन तसेच तुमच्या घराची वाट लावीन अशा धमक्या देत होता. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक ए. एस. लोखंडे यांनी या घटनेचा तपास केला. गोरे याच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयमध्ये दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासमोर झाली. सरकारी वकील प्रतिभा जाधव यांनी 14 साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्ष, अॅङ जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून दत्तात्रय गोरे यास न्यायालयाने दोषी ठरवत 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Advertisement
Tags :

.