For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीचा अपहरण; आरोपी शाहुवाडीहून ताब्यात

06:25 PM Jan 29, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   अल्पवयीन मुलीचा अपहरण  आरोपी शाहुवाडीहून ताब्यात
Advertisement

                                शाहुवाडी तालुक्यातून अपहरण आरोपी पकडला

Advertisement

पन्हाळा : अल्पवयीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेणाऱ्या तरूणास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने शाहुवाडी तालुक्यातून ताब्यात घेऊन अटक केली. रोहित संभाजी हंकारे (वय २६, रा. तळसंदे, ता. हातकलंगले) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत मुलीच्या वडिलांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात अपहारणाचा गुन्हा दाखल केला होता. हंकारे याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन विवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षकअण्णासो बाबर यांनी दिली.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार ५ जानेवारीला मुलीच्या वडीलांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना सुध्दा लग्नाचे आमिष दाखवून संशयित आरोपीने तिला पळून नेऊन ती शाहूवाडी तालुक्यात राहत होता, अशी माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला खबऱ्यांकडून मिळाली होती.
या माहिती आधारे पथकाने मंगळवारी सकाळी मुलीसह आरोपी हंकारे वाला ताब्यात घेऊन पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.

Advertisement
Tags :

.