For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

06:19 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Advertisement

9 वीची विद्यार्थिनी राहिली गरोदर : 3 युवकांवर गुन्हा नोंद

Advertisement

वृत्तसंस्था / हैदराबाद

तेलंगणात 9 वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Advertisement

तेलंगणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे. नववीची विद्यार्थिनी घरात एकटी असताना तीन  युवकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यापासून या मुलीचे लैंगिक शोषण केले जात होते. यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती.

पीडितेच्या आईने आरोपींच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी या तिन्ही युवकांवर कारवाई केली आहे. पीडित मुलगी आजारी पडल्यावर तिच्या वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे समोर आले होते. यानंतर विद्यार्थिनीने चौकशीदरम्यान सामूहिक बलात्काराची माहिती दिली होती.

Advertisement
Tags :

.