मिनॉरकडून व्हेरेव्हला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था, व्हिएन्ना
येथे सुरु असलेल्या एटीपी टूरवरील इरेस्टि बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हचे एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत अॅलेक्स डी मिनॉरने संपुष्टात आणले. या पराभवानंतरही सोमवारी घोषित होणाऱ्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत व्हेरेव्ह अग्रस्थानावर दिसेल.
सदर स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने व्हेरेव्हचा 6-4, 1-6, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या विजयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या एटीपी फायनल्स स्पर्धेसाठी मिनॉरला पात्रतेची संधी निश्चितच मिळाली आहे. सोमवारी घोषित होणाऱ्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत व्हेरेव्ह पहिल्या स्थानावर राहणार असून इटलीचा जेनिक सिनर दुसऱ्या स्थानावर राहिल. व्हिएन्नामधील स्पर्धेत अॅलेक्स डी मिनॉरचा अंतिम सामना स्पेनच्या कार्लोस अल्कारेझशी होणार आहे. अल्कारेझने उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या मेदव्हेदेवचा 6-4, 7-6 (7-2) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
